सुरांनी रंगली ‘नववर्ष पहाट’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जानेवारी 2017

पुणे - पुणेकरांची ३१ डिसेंबरची रात्र म्हणजे आनंद, जल्लोषाची असते. तसे आता नव्या वर्षाची सुरवात शास्त्रीय संगीताच्या मैफलीला उपस्थित राहून स्वरांच्या सोबतीने करण्याची परंपरा सुरू झाली आहे. त्यामुळेच गायक राहुल देशपांडे आणि महेश काळे यांच्या स्वरसाजाने सजलेल्या ‘नववर्ष पहाट’ या मैफलीला श्रोत्यांची तुडुंब गर्दी झाली होती.

नव्या वर्षाची सुरवात अविस्मरणीय करण्याचा प्रत्येकाचाच प्रयत्न असतो. त्यामुळे ‘रावतेकर ग्रुप’तर्फे नववर्ष पहाट ही अनोखी मैफल रविवारी आयोजिण्यात आली होती. त्यामुळे नव्या वर्षाची सुरवात सुरेल आणि मंगलमय वातावरणात असंख्य श्रोत्यांना करता आली. राहुल देशपांडे आणि महेश काळे यांनी मैफलीची सुरवात ‘अहीर भैरव’ रागाने केली. त्यानंतर ‘अलबेला सजन घर आयो...’ या गीताबरोबरच ‘राजा पंढरीचा...’, ‘विठ्ठल विठ्ठल...’ या त्यांच्या भक्तिगीतांनी मैफलीची उंची वाढली. ‘कट्यार काळजात घुसली’मधीलही काही रचनाही त्यांनी सादर केल्या. त्यामुळे श्रोते स्वरांच्या दुनियेत तल्लीन झाले. त्यांना निखिल पाठक (तबला), राहुल गोळे (हार्मोनिअम), ऋषिकेश पाटील आणि राजस जोशी (तानपुरा), माउली टाकळकर (टाळ) अशी साथ केली. अमोल रावतेकर उपस्थित होते. योगेश देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: new year celebration