नवे वर्ष आशा-आकांक्षांचे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 जानेवारी 2019

पुणे : नव्या आशा-आकांक्षा, नवे संकल्प, नवी ऊर्मी घेऊन येणारे नवे वर्ष पुणेकरांसाठी नवी दिशा देणारे, पायाभूत सुविधांमध्ये बदल घडविणारे, वाहतुकीसाठी दिलासा देणारे आणि अपेक्षा वाढविणारे ठरणार आहे. शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचे बदल, कौशल्य विकासाच्या नवनव्या संधी, सांस्कृतिक क्षेत्रातील भरगच्च कार्यक्रम, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका अशी धामधूम या वर्षात राहणार आहे. एका बाजूला नव्या संधी निर्माण होत असतानाच वाढता सायबर क्राईम, पाणीटंचाई आदींचा सामनाही करावा लागणार आहे. 

नवीन वर्षात हे आहे अपेक्षित

पायाभूत सुविधा 

- मेट्रो काही किलोमीटर प्रत्यक्ष धावणार 
- पीएमपीएलच्या ताफ्यात इलेक्‍ट्रिकल बसचा समावेश 
- रिंगरोडच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार 
- पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाचे भूमिपूजन 
- पुण्यातील समान पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरवात 
- जायकाच्या सहकार्याने होणार नदी सुधारणा योजनेला सुरवात 

राजकीय 

- नव्या वर्षात लोकसभा निवडणूक असेल 
- सक्षम लोकप्रतिनिधी निवडण्याची संधी 
- विधानसभा निवडणुकीत पुण्यातील आठ मतदारसंघातून विधानसभेत आमदार पाठविण्याची महत्त्वाची जबाबदारी 
- त्यापूर्वी मतदारयादीत आपले नाव आहे का, याची खात्री करावी. 
- अठरा वर्षे पूर्ण झालेल्यांनी नाव नोंदणी करावी. 

कायदा व सुव्यवस्था 

- पीडित महिला, ज्येष्ठ नागरिक व बालकांचे "भरोसा सेल'मुळे दिलासा मिळणार 
- हेल्मेटची अंमलबजावणी 
- अपघात व त्यामुळे होणारे मृत्यूच्या घटना थांबविण्यासाठी उपाययोजना 
- सायबर पोलिस ठाणे होणार अधिक सक्षम व अद्ययावत 
- सायबर गुन्हे रोखण्यासाठी विशेष उपाययोजना 
- वाढती व संघटीत गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी विशेष खबरदारी 

शिक्षण 

- शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित 
- प्राध्यापक भरतीबाबत ठोस निर्णय 
- महाविद्यालयांना स्वायत्त विद्यापीठाचा मिळणार दर्जा 
- नव्या अभ्यासक्रमानुसार दहावीची परीक्षा देणारी पहिली बॅच पडणार बाहेर 
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मेगाभरती; वेळापत्रक पाळले जाणार? 
- महापालिकेच्या शाळांना पुरेसे शिक्षक मिळणार? 

Web Title: New year is of hope aspirations