न्यू नॉर्मल लाइफचा प्रभाव; तरुणांनी केले नव्या वर्षात संकल्प

टीम ई सकाळ
Friday, 1 January 2021

गेल्यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे सगळं जग थांबलं होतं. त्यामुळे यंदाचा हा नवा वर्ष आणि त्यातील ठरविलेले संकल्प नक्कीच पूर्ण करण्याचा उद्दीष्ट तरुणांनी बाळगला आहे.

पुणे - शाळा बंद झाली, मित्रांशी संपर्क तुटला आणि सर्वकाही घरातूनच सुरू झाले. जसं की घरातच आमचे जग... या चार भिंतींच्या आत फक्त आई बाबा आणि मी... "लॉकडाऊन' हाच तो नवा शब्द होता. पण तो कशासाठी हे विचारल्यावर कोरोनामुळे हा लॉकडाऊन आहे असे समजले. शाळेत असताना पर्यावरणाबाबत फक्त वाचायचे, मात्र घरी राहून बागेतील झाडे आणि दिवसा ऐकू येणाऱ्या पक्ष्यांचा आवाज मला आवडू लागला. त्यामुळे, पर्यावरणाची खरी ओळख तेव्हा झाली आणि ते किती महत्त्वाचे आहे हे देखिल समजले. नव्या वर्षात पर्यावरणाच्या रक्षणासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार असे अवघ्या आठ वर्षाच्या जेनेट मकासरे या चिमुकलीने नव्या वर्षाच्या आपल्या संकल्पाबाबत सांगितले. 

नव्या वर्षासोबतच येतो "न्यू इअर रेजेल्यूशन' म्हणजेच नवे संकल्प आणि वर्षभर त्याला पूर्ण करण्याचा ध्येय हा सर्वांमध्ये असतो. गेल्यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे सगळं जग थांबलं होतं. त्यामुळे यंदाचा हा नवा वर्ष आणि त्यातील ठरविलेले संकल्प नक्कीच पूर्ण करण्याचा उद्दीष्ट तरुणांनी बाळगला आहे. "न्यू नॉर्मल'शी सांगड घालत नव्या वर्षात शैक्षणिक, कला, जिवनशैली आणि आरोग्य अशा विविध गोष्टींवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे युवकांकडून सांगण्यात येत आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"प्राध्यापक या नात्याने ग्रामीण व आदीवासी भागात साक्षरता पसरविण्यासाठी प्रयत्नशील राहील. त्यासाठी महिन्यातील किमान दोनदा अशा भागात जाऊन येथील लोकांपर्यंत शिक्षण आणि संगणक साक्षरता पसरविण्याचा संकल्प केला आहे.''
- राजकुमार विलास पाटील

""लॉकडाउनमुळे ग्रंथालय बंद होती, त्यामुळे स्पर्धा परिक्षांसाठीचा अभ्यास करण्यासाठी वेळोवेळी पुस्तकांची कमतरता भासत होती. सध्या सर्व काही सुरू झाले असून या नव्या वर्षात अभ्यासाची कनेक्‍टिव्हिटी ब्रेक होणार नाही याची काळजी घेणार आहे.''
- अल्ताफ बक्षी, विद्यार्थी

याबाबत गौरी देशमुख सांगते, ""कोरोनाच्या कालावधित खुप काही शिकायला मिळाले. अत्यंत कठीन परिस्थितीमध्ये सुद्धा आपण कसे स्वतःचा सांभाळ आणि त्या परिस्थितीशी समजूत घालू शकतो याचा चांगला अनुभव मिळाला. त्यामुळे न्यू नॉर्मल जिवशैलीतील काही सकारात्मक बदलांना आयुष्यभर असेच ठेवणार असून आरोग्याशी संबंधित सवयीमध्ये चांगले बदल घडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.''

हे वाचा - Welcome 2021: दरवर्षी गर्दीने गजबजून जाणारे पुण्यातील रस्ते पडले ओस!

"कोरोनामुळे लोकांच्या जीवनशैलीत विलक्षण बदल झाला आहे. त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक व मानसिक नुकसान देखिल झाले आहे. या नव्या वर्षात "राष्ट्रीय सेवा योजने'च्या अंतर्गत काम करून, समाजातील या उपेक्षित घटकांचे पुनर्वसन करण्याचे नियोजन केले आहे.''
- प्रणव पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new year resolution new normal life effect pune students youngsters