लग्नातच त्याने जाहीर केले.. आमचं पहिलं मूल सैन्यातच! (व्हिडिओ)

संदीप घिसे
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

"पुलवामामध्ये अतिरेक्‍यांनी केलेल्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. यामुळे आपल्या मुलांना लष्करात पाठवायचे की नाही, असा प्रश्‍न काही माता-पित्यांसमोर उभा राहिला आहे. मात्र या हल्ल्यामुळे आम्ही भारतीय खचून गेलेलो नाही. वेळ पडल्यास आजही आम्ही देशासाठी लढायला जाऊ. आमच्या विवाहप्रसंगी जमलेल्या नातेवाईक आणि मित्रमंडळींसमोर जाहीर करतो की आमचं पहिलं अपत्य मग तो मुलगा असो की मुलगी असो, आम्ही सैन्यात पाठविणार आहोत.'' असे सांगताच उपस्थितांनी उभे राहून टाळ्या वाजवत नवदांपत्याच्या निर्णयाचे स्वागत केले.

पिंपरी, (पुणे) : "पुलवामामध्ये अतिरेक्‍यांनी केलेल्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. त्यामुळे आम्ही भारतीय खचून गेलेलो नाही. आमच्या विवाहप्रसंगी जमलेल्या नातेवाईक आणि मित्रमंडळींसमोर जाहीर करतो की आमचं पहिलं अपत्य आम्ही सैन्यात पाठविणार आहोत'', अशी ग्वाही विवाहासाठी उपस्थित असलेल्यासमोर नवदांपत्याने केली. त्यांच्या या निर्णयाचे जोरदार स्वागत उपस्थितांनी करीत भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. त्यानंतर विवाह सोहळ्यात शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

येथील आरती आणि काळेवाडी येथील संकेश सुंबे यांचा विवाह गुरुवारी (ता.21) रावेत येथील एका हॉटेलमध्ये पार पडला. लग्नानंतर वडीलधाऱ्या मंडळीचे आर्शिवाद नवदांपत्याने घेतले. त्यानंतर नवरदेवाने माईक हातात घेतला. आम्हा दोघांना एक महत्त्वाचे सांगायचे आहे, असे संकेश यांनी सांगितले. यामुळे हॉलमध्ये शांतता पसरली. नेहमीप्रमाणे मानपानावरून रुसवे फुगवे झाले की काय, अशी कुजबूज सुरू झाली. 

"पुलवामामध्ये अतिरेक्‍यांनी केलेल्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. यामुळे आपल्या मुलांना लष्करात पाठवायचे की नाही, असा प्रश्‍न काही माता-पित्यांसमोर उभा राहिला आहे. मात्र या हल्ल्यामुळे आम्ही भारतीय खचून गेलेलो नाही. वेळ पडल्यास आजही आम्ही देशासाठी लढायला जाऊ. आमच्या विवाहप्रसंगी जमलेल्या नातेवाईक आणि मित्रमंडळींसमोर जाहीर करतो की आमचं पहिलं अपत्य मग तो मुलगा असो की मुलगी असो, आम्ही सैन्यात पाठविणार आहोत.'' असे सांगताच उपस्थितांनी उभे राहून टाळ्या वाजवत नवदांपत्याच्या निर्णयाचे स्वागत केले. मित्र मंडळींनी "भारत माता की जय' "वंदे मातरम' अशा घोषणा दिल्या. बॅंडवाल्यांनीही वादन करीत या निर्णयाचे स्वागत केले. त्यानंतर नवरदेवाने शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन मिनिटे उभे राहण्याची विनंती केली आणि विवाह सोहळ्यात शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या अनोख्या विवाह सोहळ्याची जोरदार चर्चा आता शहरात सुरू झाली आहे. 

Web Title: newly married couple pledges to send their first chlid in Indian Army