भोसरीत नवविवाहित तरुणाची आत्महत्या

संदीप घिसे
रविवार, 15 एप्रिल 2018

संदीपचे 20 दिवसांपूर्वी म्हणजे 24 मार्च रोजी घरच्यांच्या संमतीने प्रेमविवाह झाला होता. त्याने घराशेजारील रिकाम्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.

पिंपरी - अवघ्या 20 दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणाने घराशेजारील रिकाम्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना भोसरी येथे शनिवारी (ता.14) उघडकीस आली. 

संदीप दत्तात्रय कानडे (वय 23, रा.सेच्युएंका कॉलनी, भोसरी. मूळगाव राहाता, जि.अहमदनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिस हवालदार नलावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सेंच्युरीएंका कॉलनीतील मोकळ्या व आतून बंद असलेल्या खोलीतून दुर्गंधी येत असल्याची माहिती येथील रहिवाशांनी दुपारी दोन वाजताच्या सुमारास पोलिस नियंत्रण कक्षास दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता त्यात पंख्याच्या हुकाला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन संदीप यांनी आत्महत्या केल्याचे दिसून आले. 

संदीपचे 20 दिवसांपूर्वी म्हणजे 24 मार्च रोजी घरच्यांच्या संमतीने प्रेमविवाह झाला होता. तो सेच्युरीएंका कंपनीतील डॉक्‍टरांचा मदतनीस म्हणून काम करीत होता. बुधवारपासून तो घरातून बेपत्ता झाला होता. त्याची पत्नी शोध घेत होती. मात्र शनिवारी संदीपचा मृतदेह आढळून आला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. संदीप यांच्या नातेवाइकांनीही याबाबत आपली काहीही तक्रार नसल्याचे पोलिसांना सांगितले. याबाबत अधिक तपास फौजदार बुचडे करीत आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: newly wed young boy suicide in pimpri