न्यूज अँकरिंग अँड रिपोर्टिंग अभ्यासक्रम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जून 2019

कार्यशाळेबाबत

  • तारीख व वेळ - २३ जून (रविवार) स. ११ ते दु. १
  • स्थळ - एपीजी लर्निंग, सकाळनगर गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध
  • नावनोंदणीसाठी संपर्क - ७३५०००१६०१
  • पूर्वनोंदणी आवश्‍यक

पुणे - ‘एपीजी लर्निंग’ व ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने पत्रकारितेत यशस्वी करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी ‘डिप्लोमा इन न्यूज अँकरिंग अँड न्यूज रिपोर्टिंग’ हा सहा महिन्यांचा अभ्यासक्रम १५ जुलैपासून सुरू होत आहे. या अभ्यासक्रमाविषयी ‘साम’ वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक नीलेश खरे येत्या रविवारी (ता. २३) सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत एका विशेष कार्यशाळेत विनामूल्य मार्गदर्शन करणार आहेत.

अभ्यासक्रमादरम्यान न्यूज, न्यूज अँकरिंग, प्रेझेन्टेशन स्किल्स, न्यूज रूम एथिक्‍स, न्यूज रिपोर्टिंग आदी विषयांचे मार्गदर्शन वृत्तवाहिनीवरील प्रमुख पत्रकार करणार आहेत. ६० टक्के प्रात्यक्षिके व ४० टक्के थेअरी असे अभ्यासक्रमाचे स्वरूप आहे. शिकत असतानाच विद्यार्थ्यांना वृत्तवाहिनीचे काम जाणून घेता यावे, यासाठी आठवड्यातील तीन दिवस प्रशिक्षण वर्ग व दोन दिवस ‘ऑन द जॉब ट्रेनिंग’ देण्यात येणार आहे. ‘सकाळ भवन’, सीबीडी-बेलापूर, नवी मुंबई येथे होणाऱ्या या अभ्यासक्रमासाठी प्रतिव्यक्ती पन्नास हजार रुपये शुल्क असून, कोणत्याही शाखेचे पदवीधर प्रवेश घेऊ शकतील. रविवारी होणाऱ्या अभ्यासक्रमविषयक मार्गदर्शन सत्रासाठी पूर्वनोंदणी आवश्‍यक असून, विद्यार्थी किमान पदवीधर असणे आवश्‍यक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News Anchoring and reporting syllabus workshop nilesh khare