'वृत्तपत्र विक्रेता दिन' सोमवारी

Newspaper
Newspaper

पुणे - भारताच्या दक्षिण टोकावरील एका छोट्या खेड्यातला छोटा वृत्तपत्र विक्रेता ते जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ आणि भारताचे राष्ट्रपती असा विस्मयकारक प्रवास करणाऱ्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस, 15 ऑक्‍टोबर, या वर्षीपासून "वृत्तपत्र विक्रेता दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे. वाचकांपर्यंत वृत्तपत्र पोचवण्याचे महत्त्वाचे काम करणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी "सकाळ माध्यम समूहा'ने हा दिन साजरा करण्यात पुढाकार घेतला आहे.

येत्या सोमवारी (ता. 15) राज्यभर साजऱ्या होणाऱ्या "वृत्तपत्र विक्रेता दिना'च्या निमित्ताने "सकाळ'च्यावतीने विविध शहरांमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांत ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
वृत्तपत्र विक्रेत्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी "सकाळ'ने सुरू केलेल्या या उपक्रमाबाबत (स्थानिक) वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे अध्यक्ष म्हणाले.

डॉ. कलाम यांची प्रेरणा
कुटुंबाला हातभार लावण्यासाठी वयाच्या आठव्या वर्षी कलाम त्यांच्या चुलतभावाबरोबर वृत्तपत्र वितरणाचे काम करीत असत. वृत्तपत्र वितरणाच्या कामातून झालेल्या आपल्या पहिल्यावहिल्या कमाईने जागृत केलेली आत्मसन्मानाची भावना आज पन्नास वर्षांनंतरही आपल्याला जाणवत राहते, असा उल्लेख डॉ. कलाम यांनी "विंग्ज ऑफ फायर' या त्यांच्या आत्मचरित्रात केला आहे.

विक्रेत्यासोबत सेल्फी
वर्षानुवर्षे आपल्या घरी वृत्तपत्र पोचवणाऱ्या विक्रेत्यासोबत घ्या एक सेल्फी आणि सलाम करा थंडी, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता कार्यरत राहणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांना. हा सेल्फी #mynewspapervendor या हॅशटॅगसह पाठवा 99224 19150 या व्हॉट्‌सऍप क्रमांकावर किंवा wededitor@esakal.com या ई-मेलवर. या सेल्फीला ई-सकाळवर प्रसिद्धी दिली जाईल आणि आपल्या वृत्तपत्र विक्रेत्याबरोबर आपले नातेही अधिक दृढ होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com