ओम साई राम पॅनेलचा एकतर्फी विजय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

पुणे - पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष विजय पारगे यांच्या नेतृत्वाखालील ओम साई राम पॅनेलने एकतर्फी विजय मिळविला. पारगे यांना सर्वाधिक १५३१ मते मिळाली. २२१५ सदस्य संख्या असलेल्या संघाच्या सदस्यांनी मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

पुणे - पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष विजय पारगे यांच्या नेतृत्वाखालील ओम साई राम पॅनेलने एकतर्फी विजय मिळविला. पारगे यांना सर्वाधिक १५३१ मते मिळाली. २२१५ सदस्य संख्या असलेल्या संघाच्या सदस्यांनी मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील २७ अंक विक्री केंद्रांवर हे मतदान झाले. ओम साई राम व श्री स्वामी समर्थ वृत्तपत्र विक्रेता हितचिंतक पॅनेल यांच्यात खेळीमेळीत निवडणूक पार पडली. सात उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात होते.
चुरशीच्या लढतीत ओम साई राम पॅनेलने सर्वच्या सर्व १५ जागांवर एकतर्फी यश मिळविले. ही निवडणूक प्रथमच धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या देखरेखीखाली लोकशाही पद्धतीने घेण्यात आली. देशातील हा पहिलाच प्रयोग आहे.

ओम साई राम पॅनेलचे विजयी उमेदवार व कंसात त्यांना मिळालेली मते - विजय पारगे (१५३१), दत्तात्रेय पिसे (१३७१), अनंता भिकुले (१३८४), अरुण निवंगुणे (१४१०) वेगनाथ काळे (१२६८), रोहित गणेशकर (१४४४), संग्राम गायकवाड (१३३८), वसंत घोटकुले (१३४०), सुनील पवार (१३५४), गोरख फुलसुंदर (१३०६), संजय भोसले (१३३१), प्रविण माने (१२९६), जितेंद्र मोरे (१२८७), आनंद वाळके (११२९), संदीप शिंदे (१३२६).

वृत्तपत्र विक्रेता बंधू-भगिनींकरिता विविध कल्याणकारी योजना राबविण्याचा तसेच विक्रेत्यांकरिता पेन्शन योजना, घरकुल योजना, सहकारी पतसंस्था उभारणी, कुटुंबीयांकरिता मेडिक्‍लेम योजना, याशिवाय घरोघरी वृत्तपत्र टाकणाऱ्या मुलांकरिता अपघात विमा योजना आणि अन्य हितकारक योजना राबविण्याचा आमचा मानस आहे. विक्रेत्यांचा विकास हाच आमचा ध्यास व श्‍वास आहे.
- विजय पारगे, प्रमुख, ओम साई राम पॅनेल.

‘सकाळ’सोबत गेल्या तीन पिढ्यांपासूनचे नाते असलेला वृत्तपत्र विक्रेता हा ‘सकाळ’ परिवारातील एक महत्त्वाचा घटक आहे. वृत्तपत्र विक्रेता संघाच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. येणाऱ्या काळात वृत्तपत्र व्यवसायवृद्धी आणि सोशल मीडियाचे आव्हान यशस्वीरीत्या पेलण्यासाठी या कार्यकारिणीची भूमिका महत्त्वाची असेल.
- महेंद्र पिसाळ, वितरणप्रमुख, सकाळ माध्यम समूह.

Web Title: Newspaper Sailing Organisation Election