महापौरांच्या भूमिकेमुळे पुणेकरांना पुरेसे पाणी मिळणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 जानेवारी 2019

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणारे पंप बंद केल्यानंतर पाटबंधारे खात्याविरोधात थेट पोलिस ठाणे गाठण्याचा इशारा महापौरांनी दिल्यानंतर आता महापालिका प्रशासनाने शहराला 1350 एमएलडीच पाणी द्यावे, त्यात कपात नको, असे खात्याला बजावले. तसे पत्र महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पाठविले आहे. महापौर आणि प्रशासनाच्या भूमिकेमुळे पुणेकरांना पुढील काही दिवस पुरेसे पाणी मिळणार आहे. 

धरणातील पाणीसाठा आणि पाण्याचा प्रत्यक्ष वापर यामुळे पाटबंधारे खात्याने तीन दिवसांपूर्वी दोन पंप बंद केले होते. त्यामुळे पाणीसाठ्यात दोन ते अडीचशे एमएलडी कपात होण्याची शक्‍यता होती. पाटबंधारे खात्याने अचानक पंप बंद केल्याने पुणेकरांसह महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. तेव्हा महापौरांनी पाटबंधारे खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पंप सुरू करण्याची सूचना केली. त्यापलीकडे जाऊन पुन्हा बंद करण्याचे धाडस दाखविल्यास पोलिसांकडे गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला. त्यानंतर बैठकीतील चर्चेनुसार महापालिका आयुक्त राव यांनी पाटबंधारे खात्याला पत्र पाठवून, सध्या पाणीसाठ्यात कपात करू नये, असे म्हटले आहे. 

Web Title: For the next few days, Pune have enough water