बाणेर येथील कचरा प्रकल्प चार महिन्यात हटवा; जैव विविधता उद्यान उभारण्याचे 'एनजीटी'चे निर्देश

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 October 2020

या प्रकल्पातून येणा-या दुर्गंधीसह विविध मुद्यांवर स्थानिकांकडून अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र त्यावर उपाययोजना होत नसल्याने मंचच्यावतीने एनजीटीमध्ये याचिका दाखल करण्यात आली होती.

पुणे : स्थानिकांना त्रासदायक ठरणारा बाणेर येथील कचऱ्यापासून वीज निर्मिती करणारा प्रकल्प चार महिन्यांच्या आत हलविण्याचे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) पुणे महानगरपालिकेला दिले आहेत. त्या ठिकाणी जैवविविधता उद्यान उभारण्याचे निर्देश आहेत.

महत्त्वाची बातमी: प्रवाशांनो, दिवाळीसाठी पुण्यातून सुटणार १६० जादा गाड्या​

याबाबत सुसरोड बाणेर विकास मंचच्या वतीने ऍड. सौरभ कुलकर्णी यांनी पुणे महानगरपालिकेच्या विरोधात एनजीटीमध्ये धाव घेतली होती. नोबेल एक्‍स्चेंज लिमिटेड (नेक्‍स) च्या संयुक्त विद्यमाने पुणे महानगरपालिकेकडून सूस रोडवरील बाणेर येथील सर्वेक्षण क्रमांक 88 येथे कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आला होता. या प्रकल्पातून येणा-या दुर्गंधीसह विविध मुद्यांवर स्थानिकांकडून अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र त्यावर उपाययोजना होत नसल्याने मंचच्यावतीने एनजीटीमध्ये याचिका दाखल करण्यात आली होती.

अन्नदात्या, आता पर्याय नाही; बदलावी लागणार 'पीक'पद्धत!​

या प्रकरणात बुधवारी झालेल्या सुनावणीमध्ये हा प्रकल्प पर्यावरण विषयक कायद्याचे उल्लंघन करत असल्याचे न्यायाधिकरणाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यानुसार न्यायाधिकरणाने हा प्रकल्प बंद करण्याची आवश्‍यकता असल्याचे नमूद करत हा प्रकल्प हलविण्याचे आदेश दिले आहेत.

एनजीटीच्या वतीने प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. समितीच्या पाहणी अहवालात प्रकल्पामध्ये पर्यावरण कायद्याने पालन होत नसल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच नागरिकांना या प्रकल्पामुळे होणाऱ्या त्रासाबाबतची माहिती एनजीटीला देण्यात आली.
- ऍड. सौरभ कुलकर्णी, याचिकाकर्त्यांचे वकील

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NGT has directed Pune Municipal Corporation to move waste energy project from Baner