कळस - शेतकऱ्यांच्या एन.एच.एम.ची तीन ऑगस्टला लॉटरी सोडत

कळस - शेतकऱ्यांच्या एन.एच.एम.ची तीन ऑगस्टला लॉटरी सोडत

कळस - राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातंर्गत (एन.एच.एम) विविध घटकांसाठी अर्ज केलेल्या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्राप्त अर्जांची लॉटरी पध्दतीने सोडत काढण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता. ३) सकाळी दहा वाजता इंदापूरच्या नवीन प्रशासकिय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सोडत होणार असल्याची माहीती तालुका कृषी अधिकारी सूर्यभान जाधव यांनी दिली.

ते म्हणाले, राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातंर्गत विविध घटकांसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांचे आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. १ जुन ते ३० जून दरम्यान हाॅर्टनेट या संकेतस्थळावर शेतकऱ्यांनी अर्ज भरले असून, यासाठी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तालुक्यातून सुमारे २३५२ शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी आळंबी उत्पादन (०२ अर्ज), जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन (०६ अर्ज), सामूहिक शेततळे (१० अर्ज), शेततळे अस्तरीकरण (४३७ अर्ज), हरितगृह (१० अर्ज), शेडनेट हाऊस (६० अर्ज), पक्षीरोधक जाळी (१९ अर्ज), हरितगृहातील उच्चप्रतीची भाजीपाला-फुलपिके लागवड़ (११ अर्ज), प्लास्टीक मल्चिंग (१२ अर्ज), ट्रॅक्टर (११०८ अर्ज), पाॅवर टिलर (११८ अर्ज), नॅपसॅक फुटस्प्रेअर, पाॅवर स्प्रेअर (१९ अर्ज), एकात्मिक पॅकहाऊस अर्ज(०९ अर्ज), पूर्व शीतकरणगृह (०१ अर्ज), शीतगृह (०९ अर्ज), रेफरव्हॅन (१४ अर्ज), रायपनींग चेंबर (२० अर्ज), एकात्मिक पूर्वशीतकरणगृह व शीतखोली (०१ अर्ज), प्राथमिक प्रक्रिया केंद्र (१२ अर्ज), कांदाचाळ (४७४ अर्ज) यासाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. यावरुन घटकनिहाय प्रतिक्षा यादी तयार करण्यात आली आहे. उपविभागीय कृषी अधिकाऱी बालाजी ताटे, लोकप्रतिनीधी व  शेतकऱ्यांच्या उपस्थितीत ही लाॅटरी सोडत काढण्यात येणार आहे. तरी या सोडतीसाठी शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी जाधव यांनी ककेले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com