esakal | Sakal Impact : अखेर NIBM मार्गे उंड्री बससेवा सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

sakal impact

Sakal Impact : अखेर NIBM मार्गे उंड्री बससेवा सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कँटोन्मेंट : एन.आय.बी.एम. मार्गे उंड्री बससेवा सुरू करण्यासाठी भाजपा महाराष्ट्र राज्य वैद्यकीय आघाडीच्या उपाध्यक्षा डॉ. तेजस्विनी अरविंद यांनी पीएमपीएल चे व्यवस्थापक नितीन घोघरे यांच्याकडे मागणी केली होती. या निवेदनानुसार 19 जुलै रोजी सकाळ वृत्तपत्रात ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर बातमीची दखल घेत आज प्रत्यक्षात मागणीला यश प्राप्त झाले आहे.

हेही वाचा: ...तर वारंवार सर्जिकल स्ट्राईक करू, अमित शाह यांनी पाकिस्तानला दिला दम

सदर बससेवेचा शुभारंभ आज ता. 14 ऑक्टोबर रोजी महानगरपालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या हस्ते झेंडा दाखवून उंड्री चौक येथे करण्यात आला. सदर प्रसंगी बोलताना डॉक्टर तेजस्विनी अरविंद यांनी सकाळ चे आभार मानले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, सदर बससेवा ही उंड्री मार्गे हडपसर या मार्गावरून सुरू होती. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. तसेच आर्थिक भुर्दंडही पडत होता. त्यामुळे आता बससेवा सुरू झाल्याने नागरिकांच्या वेळ तसेच पडणाऱ्या आर्थिक भुर्दंड देखील कमी होणार आहे. बस क्रमांक 176 द्वारे बससेवा ही उंड्री ते पूल गेट (एन आयबीएम लुल्लानगर कमांड हॉस्पिटल मार्गे) सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा: Video: SIT अॅक्शन मोडमध्ये; तयार केला लखीमपूर घटनेचा 'क्राईम सीन'

या प्रसंगी वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, नियोजन अधिकारी, चंद्रकांत वर्पे, स्वारगेट डेपो प्रमुख राजेश कुडाळ, सचिन हांडे, जयश्री पुणेकर, जयश्री गणेश, अपर्णा देवळालीकर, वैशाली पवार, वर्षा माडेकर, डॉ अश्विन खिलारे, दादा कड, ओमकार होले, राजेंद्र भिंताडे आदी उपस्थित होते.

loading image
go to top