निगडीमध्ये सराईत गुन्हेगारास पिस्तुलासह अटक 

संदीप घिसे 
मंगळवार, 17 जुलै 2018

पिंपरी(पुणे) - पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास निगडी पोलिसांनी अटक केली. ही घटना सोमवारी रात्री चिखली येथे घडली.

पिंपरी(पुणे) - पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास निगडी पोलिसांनी अटक केली. ही घटना सोमवारी रात्री चिखली येथे घडली.

सागर ऊर्फ एसपी आनुरथ पोटभरे (वय २९, रा. स्वामी विवेकानंद सोसायटी, मोरेवस्ती, चिखली), अशी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गावठी पिस्तुल बाळगलेला एकजण मोरेवस्ती, चिखली येथे येणार असल्याची माहिती पोलिस कर्मचारी संदीप पाटील यांना मिळाली. त्यानुसार सापळा लावून संशयित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तुल व दोन काडतुसे आढळून आली. पोटभरे यांच्या विरोधात खून करणे, मारहाण करणे, अशा प्रकारचे सहा गुन्हे निगडी व देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्याने हे पिस्तूल कशासाठी आणले याबाबत निगडी पोलिस तपास करीत आहेत.

निगडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव, पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, यांच्या मार्गदर्शनाखाली, साहाय्यक निरीक्षक एल एन सोनवणे पोलीस कर्मचारी तात्या तापकीर,  संदीप पाटील, किशोर पढेर, विलास केकाण, स्वामीनाथ जाधव, चेतन मुंढे, यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Web Title: Nigadi- criminal arrested with pistols