पर्यावरणासाठी निगडी-झारखंड सायकल फेरी

प्राधिकरण - शहरातील पाच जणांनी नुकतेच निगडी ते झारखंड सायकल सफरीचे आयोजन केले होते.
प्राधिकरण - शहरातील पाच जणांनी नुकतेच निगडी ते झारखंड सायकल सफरीचे आयोजन केले होते.

पिंपरी - ‘पर्यावरण वाचवा, सायकल चालवा आणि देश प्लॅस्टिकमुक्‍त करा’, हा संदेश नागरिकांना देण्यासाठी शहरातील पाच जणांनी निगडी ते झारखंड दरम्यान सायकल सफरीचे आयोजन केले होते. दोन हजार ३१३ किलोमीटरचा प्रवास त्यांनी १५ दिवसांमध्ये पूर्ण केला. 

एमआयडीसीचे सहअभियंता प्रकाश शेडबाळे, सुदिन खोत, संजय नाईक, धनंजय शेडबाळे आणि धन्यकुमार चिंचवाडे हे या सफरीमध्ये सहभागी होते. दररोज २०० किलोमीटरचा प्रवास त्यांनी केला. मालगाव, मिरज, सांगली, बाहुबली, कुंभोज, सातारा, पुणे, नगर, औरंगाबाद, लोणार, वर्धा, नागपूर, भंडारा, राजनांदगाव यामार्गे छत्तीसगडमधून आरंग, सराईपल्ली यामार्गे ओडिशा, संबळपूरमधून ते झारखंड येथे पोचले. सायकल सफरीदरम्यान नक्षलग्रस्त भागातून प्रवास करताना कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून झारखंडचे मुख्य सचिव सुधीर रहाते यांनी पोलिस संरक्षण दिले होते. सफरीदरम्यान राज्यातील पोलिस अधीक्षकांनी सायकल चालवत पर्यावरण वाचविण्याचा संदेश दिला. या वेळी ३०० रोपे आणि ५०० कापडी पिशव्यांचे मोफत वाटप केले. प्रवासादरम्यान त्यांचे प्रत्येक राज्यांमध्ये स्वागत करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com