गावांसाठी रस्ते, पाण्याला प्राधान्य

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

निगडी - अंदाजपत्रकात समाविष्ट गावांसाठी रस्ते, पाणी आणि उद्याने यांना प्राधान्य देण्यात आले आहे. बोपखेल ते आळंदी रस्त्यासाठी दहा कोटी ६० लाख, भक्तिशक्ती चौक ते किवळे (मुकाई चौक) रस्त्यासाठी साडेबारा लाख, नाशिकफाटा ते वाकड रस्त्यासाठी वीस कोटी, चिखली येथे टाऊन हॉल उभारण्यासाठी पंचवीस कोटी, शाळेसाठी आठ कोटी, मोशीतील स्मशानभूमीसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पात समाविष्ट गावांमध्ये उद्यान विकासावर भर देण्यात आला आहे. पुनावळे आणि चऱ्होली, वाकड येथे साडेतीन कोटी रुपये खर्चून उद्याने विकसित करण्यात येणार आहेत. रस्त्यांच्या सुशोभीकरणावरही आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. मोशी आणि चऱ्होली येथे अग्निशामक केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत.

समाविष्ट गावातील पाण्याची समस्या राहणार नाही यासाठी नियोजन करण्यात आले आहे. अमृत योजनेत पुनावळे, जाधववाडी, चिखली यांचा समावेश आहे. या उपनगरासह दिघी येथे पाण्याच्या टाक्‍या उभारण्यात येणार आहेत. तसेच बोपखेल, चिखली, चऱ्होली येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

कोठे काय होणार
चिखली -  टाऊन हॉल 
मोशी, चऱ्होली - अग्निशामक केंद्रे
पुनावळे, चऱ्होली, वाकड - उद्यान 
दिघी, पुनावळे, जाधववाडी, चिखली - पाण्याची टाकी
बोपखेल, चिखली, चऱ्होली - सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प

Web Title: nigdi news pune news village road water