पुण्यात कोकेन विक्री करणाऱ्या नायजेरीयन युवकास अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

शहरातील उच्छभ्रु भागातील तरुणांना कोकेन विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या एका नायजेरीयन युवकास गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने  (पश्चिम) अटक केली. 10 लाख रुपये किंमतीचे 200 ग्रॅम कोकेनसह 12 लाख 15 हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला.

पुणे : शहरातील उच्छभ्रु भागातील तरुणांना कोकेन विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या एका नायजेरीयन युवकास गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने  (पश्चिम) अटक केली. 10 लाख रुपये किंमतीचे 200 ग्रॅम कोकेनसह 12 लाख 15 हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला.
 
उबा सेविअर गॉडविन (वय 31, रा. 303, पिसोली) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. कोंढवा येथील ब्रह्मा अवेन्यू सोसायटी समोर एक नायजेरियन व्यक्ती कोकेन विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकातील (पश्चिम) पोलिस उपनिरीक्षक महाडिक व त्यांच्या पथकास मिळाली. त्यानुसार, त्यांच्या पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. 

झडती घेत असताना त्याच्या पाठीवर असणाऱ्या सॅकमध्ये दहा लाख रुपये किंमतीचे 200 ग्रॅम कोकेन, एक लाख 84 हजार रूपयांची रोकड, एक मोबाईल, एक दुचाकी असा एकूण 12 लाख 15 हजार रुपये किंमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. याबाबत कोंढ़वा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nigerian youths arrested for selling cocaine in Pune