esakal | ...तर पुण्यातही नाईट लाइफ - अनिल देशमुख
sakal

बोलून बातमी शोधा

महावीर जैन विद्यालय - महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेच्या वतीने आयोजित संवाद कार्यक्रमात मधुकर भावे यांनी अनिल देशमुख यांची मुलाखत घेतली.

देशमुख म्हणाले...

  • ‘मुंबई २४ तास’चे माध्यमांनी मुंबई नाईट लाइफ असे नामकरण केले. 
  • ८० वर्षांपासून बंद असलेले अश्‍वपथक मुंबई पोलिस दलात सुरू केले. ते पुण्यातही सुरू करण्याचा विचार आहे. 
  • गृहमंत्रिपद मिळणार याची महिनाभर आधीच कल्पना होती. 
  • येत्या काही महिन्यांत आठ हजार पोलिसांची व महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळात सात हजार सुरक्षारक्षकांची भरती.
  • सायबर यंत्रणा सक्षम करण्यासाठी ९३५ कोटी तरतूद करण्यात येणार आहे.

मदतीसाठी लवकरच १२२ क्रमांक 
अमेरिकेच्या ९११ क्रमांकाच्या धर्तीवर राज्यातही ‘महाराष्ट्र ईमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टिम’ उभारली जात असून, त्या अंतर्गत तातडीच्या वेळी ११२ क्रमांकावर फोन केल्यास दहा मिनिटांत पोलिस, अग्निशमन दल, रुग्णवाहिकेची मदत मिळेल, अशी माहिती देशमुख यांनी दिली.

...तर पुण्यातही नाईट लाइफ - अनिल देशमुख

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘नाईट लाइफ म्हणजे चोवीस तास दारू पिऊन धिंगाणा घालणे नव्हे, हे समजून घेण्याची गरज आहे. मुंबईत या उपक्रमास प्रतिसाद मिळत आहे. हा प्रयोग यशस्वी झाला आणि भविष्यात मागणी झाल्यास पुण्यातदेखील नाईट लाइफ सुरू करू,’’ अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेच्या वतीने देशमुख यांच्याशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी देशमुख यांची या वेळी मुलाखत घेतली. या वेळी सभेचे अध्यक्ष उद्धव कानडे, कार्याध्यक्ष सचिन ईटकर, मुख्य मानद सचिव महेंद्र रोकडे, राजू ओसवाल आणि उपाध्यक्ष रवींद्र डोमाळे आदी उपस्थित होते.

पुणे : बायकोच्या आत्महत्येच्या पोलिस चौकशीला 'तो' कंटाळला अन्...

पाचशे कोटींचे ‘अँटी ड्रोन’ घेणार
भविष्यात आरडीएक्‍सच्या जागी ड्रोन, रासायनिक व जैविक अस्त्रांचा वापर करून हल्ले होऊ शकतात. चीनमध्येही कोरोना विषाणू असाच लीक झाल्याची चर्चा आहे. अशा हल्ल्यांना रोखण्यासाठी पोलिस दल सुसज्ज केले जाणार असून, ५०० कोटी रुपयांचे अँटी ड्रोन खरेदी केले जाणार आहेत, असे देशमुख यांनी सांगितले.

राज्याचे माजी मुख्यमंत्री नागपूरचे होते. गृहमंत्रालयही त्यांच्याकडेच होते. मात्र, मुख्यमंत्रिपदाच्या व्यापामुळे त्यांना गृहमंत्रालयाकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही. त्यामुळे नागपूरला गुन्हेगारी वाढली असावी.
- अनिल देशमुख, गृहमंत्री

loading image