स्टेशन परिसरातील रात्र निवाराला टाळे

प्रियांका तुपे
गुरुवार, 21 जून 2018

पुणे - शहरातल्या बेघर आणि निराश्रित लोकांसाठी असलेला पुणे स्टेशन परिसरातील महापालिकेचा रात्र निवारा प्रकल्प मागील सहा महिन्यांपासून बंद आहे. निविदाच न निघाल्याने या प्रकल्पाला सध्या टाळे लागले असून, प्रवेशद्वाराजवळ अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे निराश्रित, निराधार आणि तात्पुरत्या निवाऱ्याची गरज असलेल्यांना रस्त्यावरच रात्र काढावी लागत आहे. 

राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने दिलेल्या आदेशानुसार शहरात महापालिकेने चार रात्र निवारा प्रकल्प सुरू केले. हे प्रकल्प चालवण्यासाठी महापालिका स्वयंसेवी संस्थांची मदत घेते. यापैकी पुणे स्टेशनचा परिसर अत्यंत वर्दळीचा असून, येथील प्रकल्प सुरू राहण्याची गरज अधिक होती. परंतु, हा प्रकल्प स्वयंसेवी संस्थेला चालवण्यास देण्यासाठी निविदाच काढण्यात आली नाही. यामुळे मागील सहा महिने हा प्रकल्प बंद आहे. महापालिकेच्या समाजविकास विभागाची दिरंगाई याला कारणीभूत ठरली आहे.

केवळ तीनच प्रकल्प सुरू 
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरात एक लाख लोकसंख्येमागे एक रात्र निवारा प्रकल्प असायला हवा. पुणे शहराची अंदाजे लोकसंख्या ३८ लाख असून, शहरात चार रात्र निवारा प्रकल्प आहेत. यापैकी तीनच प्रकल्प सध्या सुरू आहेत. 

रात्र निवारा प्रकल्प 
 सेनादत्त संस्कृतिक हॉल  
 दूधभट्टी समाजमंदिर, बोपोडी
 मदर तेरेसा समाजमंदिर, येरवडा 
 मोलेदिना पार्किंग प्लाझा, पुणे स्टेशन (सध्या बंद) 

सहा महिन्यांपासून हा प्रकल्प निविदा न काढल्याने बंद आहे. मी येथे बदली होऊन आल्यानंतर आता निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. याआधीच्या अधिकाऱ्यांनी इतके दिवस निविदा का काढली नाही, याची कारणे माहीत नाहीत.
- संध्या घागरे, उपायुक्त, समाजविकास विभाग, महापालिका 

पुण्यात रात्र निवाऱ्याची सोय आहे, हे मला माहितीच नव्हते. बाहेरगावाहून पुण्यात आल्यानंतर राहण्याची सोय नसल्याने मी रात्र एसटी स्टॅंडवरच काढली. रात्र निवारा कोणत्याही परिस्थितीत बंद असता कामा नये. 
- राजेंद्र, सोलापूरहून आलेला विद्यार्थी 

Web Title: nightly project station area