नीलांगी कलंत्रे व सहकलाकारांच्या बहारदार कथ्थक नृत्याने श्रोते मंत्रमुग्ध

प्रफुल्ल भंडारी
मंगळवार, 19 जून 2018

दौंड(पुणे) - प्रख्यात नृत्यांगना गुरू रोहिणी भाटे व शरदिनी गोळे यांच्या शिष्या नीलांगी कलंत्रे यांच्या अदाकारीने नटलेल्या कथ्थक नृत्य सादरीकरणाने दौंडकरांना मोहित केले. दुर्गा स्तूतीसह भक्त प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपू यांच्यातील संवादाचा प्रसंग त्यांनी नृत्यातून उभा केला. 

दौंड(पुणे) - प्रख्यात नृत्यांगना गुरू रोहिणी भाटे व शरदिनी गोळे यांच्या शिष्या नीलांगी कलंत्रे यांच्या अदाकारीने नटलेल्या कथ्थक नृत्य सादरीकरणाने दौंडकरांना मोहित केले. दुर्गा स्तूतीसह भक्त प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपू यांच्यातील संवादाचा प्रसंग त्यांनी नृत्यातून उभा केला. 

दौंड शहरात रत्नत्रय ज्वेलर्स व रोटरी क्लब ऑफ दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने 'भावानूभूती' या कथ्थक नृत्याविष्काराचे विनामूल्य संयोजन करण्यात आले होते. नटराज पूजनाने सुरवात करण्यात आली व या वेळी रत्नत्रय ज्वेलर्सचे सुशील शहा, सोहम शहा, रोटरी क्लब ऑफ दौंडचे पदाधिकारी मनोहर बोडखे, हरेश रांभिया, सविता भोर, हरिश्चंद्र ठोंबरे, प्रमोद खांगल, आदी उपस्थित होते. 

जबलपूर (मध्य प्रदेश) येथील त्रिविधा नृत्य संस्थेच्या संस्थापिका तथा विदुषी निलांगी कलंत्रे व त्यांच्या शिष्या दक्षा सालोडकर आणि नेहा जैन यांनी कथ्थक नृत्यांचा कलाविष्कार या वेळी सादर केला. अप्रतिम पदन्यासाने दुर्गा स्तुती, भगवान शंकराचे वर्णन करणारे ध्रुपद, कृष्णा व राधा यांची विविध रुपे नृत्याद्वारे सादर करण्यात आली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धातील नृत्यसरींनी रसिकांना चिंब केले. लय व स्वरावर आधारित 
असलेल्या `बरसन लागी बदरिया` या कजरीवरील सादरीकरणाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

वैभव पाटील यांनी सूत्रसंचालन केले. नृत्य प्रशिक्षक अश्विनी दीक्षित, दीपक पारदासानी यांच्यासह सुश्मिता शहा, सृष्टी शहा, सम्यक शहा, आदी या वेळी उपस्थित होते. दौंड शहरातील रिदम डान्स अ‍ॅकॅडमी व नृत्यलीला या दोन संस्थेच्या विद्यार्थ्यांनी नृत्य कलाविष्कार सादर केले.

नीलांगी कलंत्रे यांनी कार्यक्रमापूर्वी दौंड व परिसरातील नृत्यप्रेमींना स्वतंत्रपणे कथ्थकची माहिती देत प्रात्यक्षिके सादर केली.

Web Title: Nilangini kalantrer and co-stars Kathak dance dance