अवलिया सायकलस्वार...

nilesh-ghodke
nilesh-ghodke

बारामती शहर - समाजपरिवर्तनाचे काम अनेक जण विविध पातळ्यांवर करत असतात, अनेकदा काम छोटेच असते पण ते उल्लेखनीय असते त्या मुळेच त्याची दखल घेतली जाते. बारामतीतील सायकलवर नितांत प्रेम करणारा नीलेश घोडके हाही असाच एक अवलिया...सायकलप्रेम वृध्दींगत व्हावे, सायकलचा वापर वाढावा आणि अधिकाधिक लोकांनी सायकलचा वापर वाढवावा या साठी आपल्या पातळीवर सातत्यपूर्ण प्रयत्न करणारा हा एक सायकलपटू. स्वताःला असलेला सायकलचा छंद जोपासतानाच इतरांनीही सायकलचा वापर केल्यास प्रकृती ठणठणीत राहिल इथपासून ते पर्यावरणाचे रक्षण कसे होईल हे कमालीच्या उत्साहाने सतत सांगत राहणारा हा कार्यकर्ता. सायकलचा प्रचार व प्रसार करणे हेच त्याच्या जीवन जगण्याचे ध्येय बनून राहिले असल्यासारखीच परिस्थिती. भारत फोर्ज सारख्या कंपनीत नोकरी करताना त्यांनी आपले हे सामाजिक काम सातत्याने सुरु ठेवले आहे. 

कोणालाही सायकल घ्यायची असली की नीलेश पुढे होऊन त्यांना सर्वतोपरी मार्गदर्शन करतात, इतकेच नाही तर दुकानदारांकडे जाऊन सायकलची किंमत कमी करण्यासाठी प्रसंगी वादही घालतात. अर्थात त्यांचे सायकलप्रेम सर्वश्रुत असल्याने सर्वच सायकलविक्रेतेही त्यांच्या या प्रयत्नांना मान देतात. 

अनेक ठिकाणी या प्रेमापोटी पदरमोड करण्यापासून घरच्यांची बोलणी खाण्यापर्यंतचे अनेक प्रसंग नीलेश यांच्या जीवनात येऊनही त्यांचे सायकलप्रेम काही कमी झालेले नाही. बारामती सायकल क्लबचे अॅड. श्रीनिवास वायकर यांनीही त्यांच्या या प्रयत्नात त्यांना सातत्याने मदतीचा हात पुढे केला आहे. सामाजिक परिवर्तन अशा छोट्या हातांनीच सुरु होते, कितीही अडचणी आल्या तरी सायकलचा प्रचार व प्रसार करतच राहायचा या ध्येयाने प्रेरीत झालेल्या नीलेश घोडके यांचे प्रयत्न या साठी वेगळे ठरतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com