वसंत मोरेंच्या कट्टर समर्थकाचा मनसेला 'जय महाराष्ट्र', दोन नेत्यांवर गंभीर आरोप

Nilesh Mazire Resigns MNS
Nilesh Mazire Resigns MNSSakal

पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लागलेली गळती अद्याप थांबलेली नाही. माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांची नाराजी दूर करण्यात आणि पक्षांतर्गत कार्यकर्त्यांची घुसमट थांबवण्यात पक्षनेतृत्वाला कसरत करावी लागणार आहे. (Vasant More News)

मोरे यांची काही कार्यक्रमांना अनुपस्थिती आणि त्यातून चव्हाट्यावर आलेली खदखद उघड आहे. यातच आता मोरेंचे कट्टर समर्थक आणि मनसेच्या माथाडी सेनेचे माजी शहराध्यक्ष निलेश माझिरे यांनी पक्ष सोडलाय. यावेळी त्यांनी मनसेतील दोन नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या होत्या. मात्र याबद्दल माझिरेंनी अद्याप स्पष्ट वक्तव्य केलेलं नाही.

Nilesh Mazire Resigns MNS
सभेआधीच पुण्यात मनसेला धक्का; वसंत मोरेंच्या कट्टर कार्यकर्त्याचा पक्षाला रामराम

मनसे सोडताना माझिरेंनी पक्षात होणारी घुसमट बोलून दाखवली. मी पक्ष सोडण्याचं मुख्य कारण हे मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि राज्य सरचिटणीस बाबू वागस्कर आहेत, असं ते म्हणाले. कोअर कमिटीतील इतर सदस्यांचा त्यांच्या कृत्यांना पाठिंबा आहे. मी पक्ष सोडणार असल्याच्या बातम्या 19 मे रोजी काही माध्यमांत आल्या होत्या.

यावर मी स्पष्टीकरणही दिलं. पण पक्षातील काहींनी या बातम्या पेरण्याचं काम केलं. यानंतर माझिरे यांची हकालपट्टी करा, असं बाबर म्हणाले होते. तू पक्षात राहणार आहेस का? अशी विचारणा वागस्कर यांनी केली होती. मला बोलावून घेऊन तुम्ही पक्षात राहणार का? असं विचारणं म्हणजे हुकूमशाहीचं लक्षण आहे, असं माझिरे म्हणाले.

वरिष्ठांच्या या वागण्यामुळे माझी घुसमट होत होती. मी वसंत मोरेंचा समर्थक असल्याने कोअर कमिटीने मला डावलण्यास सुरुवात केली. पक्ष सोडत असल्याची माहिती मोरेंना दिली आहे, असं माझिरे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com