जुन्नर : निमगिरीला स्वयंचलित हवामान केंद्र सुरू

पृथ्वी मंत्रालय अंतर्गत भारतीय हवामानशास्त्र पुणे विभागाच्या मार्फत या केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.
pune
punesakal

जुन्नर : आदिवासी भागातील निमगिरी ता. जुन्नर येथे आज सोमवार ता.०२ रोजी स्वयंचलित हवामान केंद्र (automatic weather station) सुरू करण्यात आले. पृथ्वी मंत्रालय अंतर्गत भारतीय हवामानशास्त्र पुणे विभागाच्या मार्फत या केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. पुणे येथील हवामान विभाग प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांचे हस्ते या केंद्राचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी हवामान विभागाचे (Meteorological Department) कर्मचारी जे.डी.इंदुरीकर, संजय साबळे, प्रताप रसाळ, अविनाश कुंडले, तसेच पंचायत समिती सदस्य काळूराम गागरे, सरपंच सुमन साबळे ,युवक कार्यकर्ते जालिंदर साबळे, रामदास भांबुरे, डी.व्ही. केंद्रे, संतोष साबळे, ग्रामसेवक एस.के. दिघे व ग्रामस्थ उपस्थित होते. (Nimgiri launches automatic weather station)

भारतीय हवामानशास्र पुणे विभाग येथे कार्यरत असलेले निमगिरी गावचे सुपुत्र संजय सिताराम साबळे व विजय सिताराम साबळे या बंधूनी यासाठी आपली स्वतःची दोन गुंठे जागा उपकरण उभारणीसाठी विनामूल्य दिली.

pune
शहराच्या वेगवेगळ्या भागात बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना

या केंद्रामुळे सह्याद्रीच्या पर्वत रांगातील जवळपास सर्व गावांना तसेच स्थानिक शेतकऱ्यांना शेतीसाठी हवामानाचा अचूक अंदाज मिळणार आहे. मोबाईल अँपद्वारे तापमान, पर्जन्यमान, आद्रता, वाऱ्याची दिशा ही देखील माहिती एका क्लीकद्वारे IMD च्या AWSARG च्या वेबसाईटवर शेतकऱ्यांना मिळणार आहे.

अनुपम काश्यपी, प्रताप रसाळ व अविनाश कुंडले यांनी उपकरणाची माहिती ग्रामस्थांना सांगितली व जे.डी.इंदुरीकर यांनी आभार मानले. प्रास्ताविक विजय साबळे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com