एसटी उलटून नऊ प्रवासी जखमी 

एसटी उलटून नऊ प्रवासी जखमी 

सांगवी (पुणे) : बारामती-फलटण राज्य महामार्गावर शिरवली (ता. बारामती) येथे एसटी उलटून झालेल्या अपघातात 9 प्रवासी जखमी झाले. हा अपघात बुधवारी (ता. 11) दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास झाला. 

बारामतीहून फलटणच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोचा (क्र. एमएच 43 यू 4180) टायर फुटल्याने तो एसटीच्या दिशेने जात असताना टेम्पोला चुकविताना फलटणहून बारामतीच्या दिशेने जाणारी एसटी बस (क्र. एमएच 14 बीटी 4410) उलटून 9 प्रवासी जखमी झाले. यामध्ये 4 महिला व 5 पुरुषांचा समावेश आहे.

स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांच्या मदतीने जखमी प्रवाशांना उपच्यारासाठी बारामती येथील सिल्वर ज्यूबली रुग्णालय व सांगवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती पोलिस नाईक जयंत ताकवले यांनी दिली 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com