नऊ प्रभाग समित्यांचे अध्यक्ष होणार बिनविरोध 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

पुणे - महापालिकेच्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल झाले. पंधरापैकी नऊ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड बिनविरोध होईल. यात भाजपला आठ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला एक अध्यक्षपद मिळेल. उर्वरित सहापैकी एका ठिकाणी चिठ्ठीद्वारे अध्यक्षपद निश्‍चित होईल, तर पाच ठिकाणी मतदानातून निवड केली जाणार आहे. 

पुणे - महापालिकेच्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल झाले. पंधरापैकी नऊ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड बिनविरोध होईल. यात भाजपला आठ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला एक अध्यक्षपद मिळेल. उर्वरित सहापैकी एका ठिकाणी चिठ्ठीद्वारे अध्यक्षपद निश्‍चित होईल, तर पाच ठिकाणी मतदानातून निवड केली जाणार आहे. 

प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक 16 एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता होईल. संख्याबळानुसार नऊ ठिकाणी ही निवड बिनविरोध होईल. भाजपकडून औंध- बाणेर प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी अमोल बालवडकर, शिवाजीनगर- घोले रोड प्रभाग समिती स्वाती लोखंडे, सिंहगड रस्ता प्रभाग समिती अनिता कदम, कोंढवा- येवलेवाडी प्रभाग समिती वीरसेन जगताप, कसबा- विश्रामबागवाडा प्रभाग समिती योगेश समेळ, बिबवेवाडी प्रभाग समिती रूपाली धाडवे, येरवडा- कळस- धानोरी प्रभाग समिती अनिल टिंगरे, कोथरूड- बावधन प्रभाग समिती अल्पना वरपे यांची आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून वानवडी- रामटेकडी प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी गफूर पठाण यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. 

नगर रस्ता- वडगाव शेरी प्रभाग समितीमध्ये भाजपकडून श्‍वेता खोसे- गलांडे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सुमन पठारे, धनकवडी- सहकारनगर प्रभाग समितीमध्ये राष्ट्रवादीकडून किशोर धनकवडे आणि भाजपकडून दिशा माने, वारजे- कर्वेनगर प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी भाजपकडून दीपक पोटे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून दीपाली धुमाळ, हडपसर- मुंढवा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून हेमलता मगर आणि भाजपच्या उज्ज्वला जंगले, भवानी पेठ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी भाजपच्या मनीषा लडकत आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या लक्ष्मी आंदेकर यांनी अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक होणाऱ्या पाचपैकी तीन ठिकाणी भाजप आणि दोन ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसला अध्यक्षपद मिळू शकते. 

संख्या समान असल्याने  चिठ्ठीद्वारे होणार निवड 
ढोले पाटील प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी कॉंग्रेसच्या लता राजगुरू आणि भाजपच्या लता धायरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या ठिकाणी दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांची संख्या समान असल्याने येथे चिठ्ठीद्वारे निवड केली जाईल. 

Web Title: nine ward committee will be elected unanimously