रस्त्यांसाठी ९९ कोटींचा निधी

रस्त्यांसाठी ९९ कोटींचा निधी

शेटफळगढे - मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ३५ रस्त्यांच्या जवळपास १५४ किलोमीटर लांबीच्या अंतराच्या कामासाठी ९८ कोटी ८६ लाख ९५ हजारांचा निधी जिल्ह्याला मंजूर झाला आहे. याबाबतच्या अंदाजपत्रकांना नुकतीच ग्रामविकास विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.  

या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ज्या रस्त्यांच्या कामासाठी व रस्त्यांच्या पाच वर्षे देखभाल दुरुस्तीसाठी प्रशासकीय मान्यतेने निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्या रस्त्यांची तालुकानिहाय नावे व कंसात मंजूर निधीची रक्कम पुढीलप्रमाणे - 

इंदापूर तालुका - गोतोंडी ते दगडवाडी रस्ता (५ कोटी ३३ लाख ५४ हजार),  रेडणी ते बोराटवाडी रस्ता (३ कोटी १४ हजार).

जुन्नर तालुका - प्रजिमा ६ ते पारुंडे बुचकेवाडी दातखिळवाडी काळे विठ्ठलवाडी रस्ता (३ कोटी ३ लाख ७४ हजार), प्रजिमा ६ ते वाजेवाडी रस्ता (१ कोटी ३७ लाख ४९ हजार), इजिमा १९ आंबेदरा रस्ता (८४ लाख ९१ हजार), प्रजिमा ९ ते चांदपिरबाबा रस्ता (१ कोटी ९१ लाख ९४ हजार), प्रजिमा २ नेतवड रस्ता (१ कोटी ७६ लाख ५४ हजार), रामा ५३ ते रानमळा रस्ता (२ कोटी ६२ हजार).

पुरंदर तालुका - राज्य मार्ग १३१ भिवरी कानिफनाथ जाधव वस्ती रस्ता (२ कोटी ८७ लाख २२ हजार), राज्य मार्ग ११९ ते कुंजीर स्थळ रस्ता (३ कोटी २० लाख ५९ हजार), इजिमा ११३ पाटील वस्ती चावरे वस्ती रस्ता (२ कोटी १६ लाख ७२ हजार).

दौंड तालुका - राज्य मार्ग ६० कुरकुंभ रस्ता ते भोळेबाचीवाडी ते कौठडी रस्ता (३ कोटी २८ लाख ७५ हजार), राज्य मार्ग ६८ कानगाव गवळीमळा रस्ता (२ कोटी ३३ लाख २५ हजार), राज्य मार्ग ९ यवत ते मलभारे वस्ती रस्ता (७६ लाख २० हजार), राज्य मार्ग ९ वाखारी ते पाटीलवाडी रस्ता (४ कोटी ५४ लाख ७ हजार).

बारामती तालुका - राज्य मार्ग १२१ ते काटेवाडी कोऱ्हाळे रस्ता (३ कोटी ६४ लाख ९५ हजार), प्रजिमा १५३ भगतवाडी ते चौधरवाडी रस्ता (३ कोटी १२ लाख ९६ हजार), मानाप्पा वस्ती ते टेगलफाटा कोकरे वस्ती सोलनकर वस्ती रस्ता (३ कोटी ७९ लाख ३७ हजार), राज्य मार्ग ६० ते शिर्सुफळ रस्ता (१ कोटी ६१ लाख ५९ हजार).

शिरूर तालुका - पिंपरी दुमाला ते वाघाळे रस्ता (२ कोटी ८० लाख १५ हजार), प्रराम ५ शिक्रापूर ते जातेगाव खुर्द करंदी केंदूर रस्ता (३ कोटी ४३ लाख ३७ हजार), कर्डे दहिवडी रस्ता (६ कोटी १३ लाख ४८ हजार), प्रजिमा १०० मांडवगण फराटा ते इनामगाव रस्ता (२ कोटी ६५ लाख ८ हजार).

खेड तालुका - चाकण ते गाडेकर वस्ती रस्ता (२ कोटी ९६ लाख ७ हजार), प्रजिमा १९ दावडी जाधववाडी रस्ता (२ कोटी ३९ लाख १८ हजार), दावडी ते धामणटेक रस्ता (३ कोटी १० लाख ५ हजार).

हवेली तालुका - राज्य मार्ग ९ ते सरतोपवाडी, शितोळे वस्ती रस्ता (४ कोटी २४ लाख ३ हजार), राज्य मार्ग ११५ आगळंबे ते ठाकरवाडी रस्ता (३ कोटी ५२ लाख ७७ हजार), राज्य मार्ग १२० ते मोडकमळा कानिफनाथ रस्ता (२ कोटी २ लाख ६४ हजार).

आंबेगाव तालुका - घोडेगाव कोटमदरा कोळवाडी रस्ता (२ कोटी ८५ लाख १ हजार), प्रजिमा ४८ महाळुंगे पडवळ नवलेमळा रस्ता (१ कोटी ६३ लाख ८६ हजार).

मुळशी तालुका - प्रजिमा २७ ते शेडगेवाडी माळेगाव धनगरवस्ती रस्ता (२ कोटी ७२ लाख ७८ हजार), प्रराम ०५ ते आमराळवाडी रस्ता (१ कोटी ६९ लाख ५ हजार), प्रजिमा २६ नांदगाव खराडेवस्ती रस्ता (१ कोटी ९५ लाख ६ हजार) प्रजिमा २४ ते जांभूळकरवस्ती बार्पे रस्ता (४ कोटी ५३ लाख ५ हजार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com