निपुण धर्माधिकारीने ट्विट करुन विनोदी शैलीत महापालिकेला मारला टोमणा  

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

पुण्यातील निपुण धर्माधिकारीच्या घराजवळ काही दिवसांपूर्वीच गतिरोधक बांधण्यात आला. परंतु त्याची रचना मात्र अशास्त्रीय पद्धतीने करण्यात आली. गतिरोधकाची उंची गरजेपेक्षा जास्तच वाढवली आहे. याचा त्रास तेथील नागरिकांना होत आहे.

पुण्यातील निपुण धर्माधिकारीच्या घराजवळ काही दिवसांपूर्वीच गतिरोधक बांधण्यात आला. परंतु त्याची रचना मात्र अशास्त्रीय पद्धतीने करण्यात आली. गतिरोधकाची उंची गरजेपेक्षा जास्तच वाढवली आहे. याचा त्रास तेथील नागरिकांना होत आहे.

निपुणला देखील त्याचा त्रास होणे सहाजिक आहे. महापालिकेच्या या ढोबळ कारभारावर निपुणने स्वतःच्या शैलीत टिका केली. "आमच्या घरापाशी नवा स्पीडब्रेकर बांधला आहे. सकाळी त्यावर खूप लोक फिरायला जातात. वरुन व्ह्यु फार चांगला आहे अस ऐकलंय." , असा टोमणा निपुणने  पुणे महापालिकेला मारला. वैयक्तीत ट्विटर अकांउटवरुन त्याने असे ट्विट करत महापालिकेला विनोदी शैलीत सुनावले. त्याच्या ट्विटवर फॉलोअर्सनी देखील याविषयी प्रतिकिया देत महापालिकेच्या कामकाजावर टिका केली.

सध्या पुण्यात बऱ्याच ठिकाणी हेच चित्र दिसत आहे. शहरात ठिकठिकाणी नवे गतिरोधक बांधण्यात आले. मात्र अशास्त्रीय पद्धतीने बांधलेल्या गतिरोधकची उंची गरजेपेक्षा जास्तच वाढवली जाते. या उंच गतिरोधकामुळे वाहनचालकांना त्रास होतो. वेगवान वाहनांचा वेग कमी करण्यासाठी बांधलेले हे गतिरोधक आता वाहनचालकांसाठी त्रासरदायक ठरत आहे. कित्येक ठिकाणी तर नुकतेच बांधलेले गतिरोधक पुन्हा काढताना दिसत आहे. पुणे महापालिकेच्या अशा कामकाजावर आता सेलिब्रेटी देखील व्यक्त होत आहे.

 

Web Title: nipun dharmadhikari tweeted sarcastically to municipal corporation