नीरा नदीकाठावरील 77 कुटुंबे सुरक्षितस्थळी

chintamani kshirsagar
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

नीरा नदीला आलेल्या पाण्याचा वेढा बारामती तालुक्‍यातील निंबूत, होळ गावठाण, कोऱ्हाळे खुर्द गावाला दुसऱ्या दिवशीही कायम राहिला आहे. त्यामुळे नदीकाठावरील 77 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. 

वडगाव निंबाळकर (पुणे) : नीरा नदीला आलेल्या पाण्याचा वेढा बारामती तालुक्‍यातील निंबूत, होळ गावठाण, कोऱ्हाळे खुर्द गावाला दुसऱ्या दिवशीही कायम राहिला आहे. त्यामुळे नदीकाठावरील 77 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. 

नदीचे पाणी निंबूत येथील लक्ष्मीनगर, आनंदनगर भागात घुसले आहे. येथील 23 कुटुंबांचे स्थलांतर केले आहे. शाळेच्या इमारतीत तात्पुरती सोय केली आहे. कोऱ्हाळे खुर्द भागातील जाधव आळीमधील 4 कुटुंबे प्राथमिक शाळेत हलवली आहेत. शिरवली येथील 4, मेखळीमधील 33, सोनगावमधील 13, निरावागजमधील 2 कुटुंबांना सुरक्षित स्थळी नेले आहे. 

नदीकाठावरील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सरकारी पातळीवरून सर्व त्या उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती तहसीलदार विजय पाटील यांनी दिली. बुधवारी (ता. 6) सकाळी अकरा वाजता नीरा नदीकाठच्या गावांत जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, पंचायत समिती सभापती संजय भोसले, सोमेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष शैलेश रासकर, संचालक सिद्धार्थ गीते, प्रमोद काकडे, गटविकास अधिकारी प्रमोद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, राजवर्धन शिंदे यांनी पाहणी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nira : 77 Families Moved to Safe place