बारामतीच्या सौंदर्यात भर घालणार नीरा डावा कालवा

मिलिंद संगई
Wednesday, 30 September 2020

बारामती शहरातून वाहणाऱ्या नीरा डावा कालव्याचे मजबूतीकरण, नूतनीकरण करण्याचे काम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हाती घेतले. जलसंपदा, बारामती नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने सहा कि.मी. लांबीच्या या कालव्याचे नूतनीकरण व सौंदर्य वाढविण्याचे काम केले जाणार आहे. हा कालवा बशीच्या आकाराचा झाला होता, त्याला पूर्वीचे स्वरुप देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

बारामती  : शहराची जीवनवाहिनी असलेला नीरा डावा कालवा अनेक वर्षांनंतर कात टाकतो आहे. बारामतीच्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार असलेला नीरा डावा कालवा येत्या काही दिवसात बारामतीच्या सौंदर्यस्थळांपैकी एक म्हणून गणला जाईल. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामती शहरातून वाहणाऱ्या नीरा डावा कालव्याचे मजबूतीकरण, नूतनीकरण करण्याचे काम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हाती घेतले. जलसंपदा, बारामती नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने सहा कि.मी. लांबीच्या या कालव्याचे नूतनीकरण व सौंदर्य वाढविण्याचे काम केले जाणार आहे. हा कालवा बशीच्या आकाराचा झाला होता, त्याला पूर्वीचे स्वरुप देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

असा आहे इतिहास......
सन 1881 मध्ये दुष्काळात लोकांच्या हाताला काम मिळावे या साठी इंग्रजांनी या कालव्याचे काम सुरु केले होते. 1922 आणि नंतर 1954 मध्ये दोनदा या कालव्याचे नूतनीकरण झालेले होते. वीर धरणातून सुरु होणारा 158 कि.मी. लांबीचा हा डावा कालवा बावड्यानजिक संपतो. असंख्य शेतक-यांसाठी वरदान ठरलेल्या या कालव्याची क्षमता 500 क्यूसेक्स घनफूट प्रतिसेकंद इतकी आहे. बारामतीत नूतनीकरण झाल्यानंतर ही क्षमता 900 क्यूसेक्स इतकी होईल. 

राजसाहेबांच्या भेटीने मनसैनिकांना दहा हत्तींचे बळ

खातेनिहाय झाले उत्तम काम
जलसंपदा विभागाच्या साठवण तलावाच्या कामातून निघालेला मुरुम वापरुन सहा कि.मी. लांबीच्या या कालव्याचे मजबूतीकरण करण्यात आले आहे. या साठी कोणतीही स्वतंत्र निविदा किंवा निधी देण्यात आला नाही. जलसंपदा विभागाचेच 28 पोकलेन, 60 टिपर, 4 व्हायब्रेटर वापरुन फक्त डिझेलच्या खर्चातून हे काम केले गेले. यातही 12 टिपर लोकसहभागातून उपलब्ध करुन देण्यात आले होते.  

बारामतीच्या सौंदर्यात भर पडणार....
नीरा डावा कालव्याचे काम वेगाने सुरु आहे. हे संपूर्ण काम पूर्ण झाल्यानंतर शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. बारामती स्वच्छ, सुंदर व हरित असावी या अजित पवार यांच्या संकल्पनेनुसारच आम्ही सर्व जण काम करीत आहोत. निविदा न काढता इतके मोठे काम कसे होऊ शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे- सचिन सातव, गटनेते, बा.न.प. 

तीन हत्ती चौकाचा होणार सिटी सेंटर....
शहरातील तीन हत्ती चौकाचे स्वरुप आमूलाग्र बदलले जाणार असून येथे सिटी सेंटर टाऊन हॉल अशी संकल्पना प्रत्यक्षात येणार आहे. पूलाची रुंदी वाढवून सुशोभिकरण करुन रस्ता वळवून येथे अत्यंत सुंदर चौक अस्तित्वात येणार आहे. वाहतूकीची कोंडी टाळण्यासह शहराच्या सौंदर्यात भर टाकणारा हा सिटी सेंटर होईल. लवकरच याचे काम सुरु होणार आहे.- किरण गुजर, ज्येष्ठ नगरसेवक.

काय काम होणार....
बारामती हद्दीत कालव्याचे मुरुम टाकून मजबूतीकरण करण्यात आले आहे. या कालव्याचे लायनिंग करण्यासह इतर काही कामासाठी बारामती नगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत निधी उपलब्ध करुन देणार आहे. 

•    नागरिकांसाठी होणार वॉक वे
•    ओपन जिम 
•    बसण्यासाठी सोळा ठिकाणी जागा
•    फिरण्यासाठी स्वतंत्र मार्गिका
•    विविध ठिकाणी विद्युतीकरण
•    काही ठिकाणी लँडस्केपिंग
•    तीन हत्ती चौकात होणार सिटी सेंटर टाऊन हॉल. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nira left canal will add to the beauty of Baramati