'वनस्थळी'च्या अध्यक्षा निर्मलाताई पुरंदरे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, वनस्थळीच्या अध्यक्षा, पुण्यभूषण पुरस्कार विजेत्या निर्मलाताई पुरंदरे यांचे आज (शनिवार) निधन झाले.

पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, वनस्थळीच्या अध्यक्षा, पुण्यभूषण पुरस्कार विजेत्या निर्मलाताई पुरंदरे यांचे आज (शनिवार) निधन झाले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या त्या पत्नी होत्या.

निर्मलाताई पुरंदरे यांनी वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र ही संस्था १९८१ मध्ये स्थापन केली. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात शैक्षणिक काम करणारी एक संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक कार्य केले. वयाच्या सातव्या वर्षापासून शिक्षण देण्याची जबाबदारी पत्करली असल्याने, ३ ते ६ या वयांतील मुलांसाठी बालवाड्या उघडून त्यांच्या शिक्षणाची सोय ही संस्था करते. त्यासाठी बालवाडी चालविण्याचे ६ महिन्याचे शिक्षण ही संस्था ग्रामीण स्त्रियांना त्यांच्याच गावी जाऊन देते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nirmalatai Purandare passes away