esakal | ‘निसर्गयात्री - इंदिरा गांधी’ पुस्तकाचे सोमवारी प्रकाशन
sakal

बोलून बातमी शोधा

Nisargyatri

‘निसर्गयात्री - इंदिरा गांधी’ पुस्तकाचे सोमवारी प्रकाशन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निसर्गप्रेमी प्रतिमेची ओळख करून देणाऱ्या ‘इंदिरा गांधी : अ लाइफ इन नेचर’ या माजी केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा मराठी अनुवाद येत्या सोमवारी (ता. २१) प्रसिद्ध होत आहे.

सकाळ प्रकाशन प्रसिद्ध करीत असलेल्या ‘निसर्गयात्री ः इंदिरा गांधी’ या अनुवादाचे प्रकाशन ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या हस्ते होईल. लेखक जयराम रमेश व ‘सकाळ माध्यम समूहा’चे संपादक संचालक श्रीराम पवार यांची या कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे. टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी ६ वाजता हो कार्यक्रम होणार आहे. या पुस्तकाचा अनुवाद ‘सकाळ’च्या पुणे आवृत्तीचे वृत्तसंपादक माधव गोखले यांनी केला आहे. या पुस्तकाची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू झाली असून, ६५० रुपये मूल्याचे हे पुस्तक प्रकाशनपूर्व नोंदणी केल्यास ३० टक्के सवलतीसह ४५० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. 

नोंदणीसाठी संपर्क - 
‘निसर्गयात्री - इंदिरा गांधी’च्या नोंदणीसाठी व ‘सकाळ प्रकाशना’च्या अन्य दर्जेदार पुस्तकांसाठी संपर्क - ‘सकाळ प्रकाशन’, ‘सकाळ कार्यालय’, ५९५ बुधवार पेठ, पुणे २. फोन : ८८८८८ ४९०५० किंवा लॉग इन करा : www.sakalpublications.com, amazon.in किंवा bookganga.com

loading image
go to top