पवना नदी स्वच्छतेसाठी पिंपळे गुरव येथील तरूणांचा पुढाकार

मिलिंद संधान
गुरुवार, 12 एप्रिल 2018

नवी सांगवी - पिंपळे गुरव येथील शंकर जगताप मित्र परिवार, भैरवनाथ तरूण मंडळ, चावडी ग्रुप, जागृती मित्र मंडळ, वैदु समाज यांच्या सहकार्याने नदी स्वच्छता अभियान सुरू झाले आहे. पहिल्या टप्यात पिंपळे गुरव - कासारवाडी पुल ते गावठानापर्यंतच्या पाचशे मिटर अंतरावर नदी स्वच्छता केली जाणार आहे. नदीपात्रात वाढलेले अनावश्यक तण, वेली व इतर पानवनस्पती काढून त्या स्वच्छ करण्याचा ध्यास येथील तरूणांनी घेतला आहे. याबाबत महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डिकर यांनीही येथे भेट देऊन महापालिकेकडून सर्व सहकार्याचे आश्वासन या तरूणांना दिले आहे.

प्रदुषित पवना नदी हा विषय आता नवीन राहिला नाही. दरवर्षीचा जलपर्णीचा प्रश्न, त्यामुळे सुटणारी दुर्गंधी व डासांचा उपद्रव. त्यावर सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोपप्रत्यारोप होत रहातात. नदी स्वच्छतेचे वर्षभराचे टेंडर काढले जाते पण प्रत्यक्षात पवनामाई दिवसेंदिवस अधिकच दुषित होत चालली आहे. त्यातच नदीच्या पात्रातून मैलामिश्रित पाण्याच्या वाहिन्या गेल्या आहेत. त्याचे चेंबर बहुतांश ठिकाणी फुटल्यामुळे ते मैला मिश्रित पाणी सर्रास नदीच्या पाण्यात मिसळले जात आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाला या चेंबर दुरूस्तीसाठी असंख्य अडचणी येतात. चेंबर सभोवती दाट पानवस्पती, तण, झुडपे वाढल्याने तेथे काम करणे जिकरीचे बनते आहे. त्यातच एवढे करून जर मजूर कामाला लागले तर तेथे सापांसारखे सरपटणारे प्राणी धोका निर्माण करीत आहे. 

त्यामुळे शंकर जगताप मित्र परिवार व पिंपळे गुरव मधिल मंडळांनी एकत्र येवून नदी स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. याची पाहणी करण्यासाठी महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर स्वतः आले होते. यावेळी त्यांच्या सोबत नगरसेवक शशिकांत कदम, सागर अंघोळकर, कैलास बारणे, नगरसेविका चंदा लोखंडे, उषा मुंढे, मंडळाचे पदाधिकारी माऊली जगताप, जीवन जाधव, आदेश नवले, सचिन सोनवणे, शिवाजी निम्हण, सुनिल देवकर हे उपस्थित होते. आयुक्तांनीही नदीस्वच्छतेसंबंधी काही सूचना करीत या प्रकल्पाचे स्वागत केले.

Web Title: nitiatives of youth at Pimpale Gurav for cleanliness of Pawana river