उलगडली उद्योगाची गगनभरारी

बालगंधर्व रंगमंदिर - नितीन देसाई यांचा सत्कार करताना डॉ. अभय फिरोदिया. या वेळी डॉ. नितीन करमळकर, प्रतापराव पवार, बी. आर. मल्होत्रा, राजकुमार चोरडिया, रामकुमार राठी, हरिभाई शहा, हसमुख पटेल,  डॉ. विनोद शहा, राजेश शहा आदी उपस्थित होते.
बालगंधर्व रंगमंदिर - नितीन देसाई यांचा सत्कार करताना डॉ. अभय फिरोदिया. या वेळी डॉ. नितीन करमळकर, प्रतापराव पवार, बी. आर. मल्होत्रा, राजकुमार चोरडिया, रामकुमार राठी, हरिभाई शहा, हसमुख पटेल, डॉ. विनोद शहा, राजेश शहा आदी उपस्थित होते.

पुणे - ‘फूड प्रॉडक्‍ट व्यवसायात प्रमाणीकरण, दर्जा आणि परवडणारी किंमत ठेवल्याने आमची उत्पादने जगभर लोकप्रिय झाली. मला सामाजिक सेवेचा वारसा वडिलांकडून मिळाला. जीवनामध्ये ‘सब का साथ, सब का विश्वास’ हे तत्त्व राखल्याने यश मिळाले,’’ असे मत उद्योगपती आणि ‘देसाई ब्रदर्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नितीन देसाई यांनी व्यक्त 
केले.

जनसेवा फाउंडेशनतर्फे बालगंधर्व रंगमंदिरात ‘मीट द स्टालवर्ट’ (भेटूया एका दिग्गजाला) या कार्यक्रमांतर्गत झालेल्या प्रकट मुलाखतीत देसाई बोलत होते. फाउंडेशनसह विविध संस्था, ज्येष्ठ नागरिक संघटना आणि नितीन देसाईप्रणीत विविध समाजोपयोगी संस्थांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याचे उद्‌घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते झाले. फोर्स मोटर्सचे अध्यक्ष डॉ. अभय फिरोदिया अध्यक्षस्थानी होते. 

वेकफिल्ड उद्योगसमूहाचे अध्यक्ष बी. आर. मल्होत्रा, ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, राजकुमार चोरडिया, रामकुमार राठी, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. विनोद शहा, राजेश शहा आदी उपस्थित होते. 

अभिनेते आणि निवेदक राहुल सोलापूरकर आणि डॉ. वर्धमान जैन यांनी मुलाखतीत देसाई यांच्याशी संवाद साधला. देसाई म्हणाले, ‘‘विदेशात उच्चशिक्षण घेऊनही मी विडी व्यवसायाकडे वळालो. यातून सुमारे एक लाख कामगारांना रोजगार मिळवून देण्याची संधी मला मिळाली. हे मी माझे भाग्य समजतो.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com