नितीन गडकरींना भोवळ आल्याने पुणे दौरा रद्द 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

पुणे : केंद्रीय महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे पुण्यातील कार्यक्रम गुरुवारी (ता. 1 ऑगस्ट) अचानक रद्द करण्यात आले. सोलापूरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान त्यांना भोवळ आल्यामुळे हे कार्यक्रम रद्द झाले आहेत.

सोलापूरमध्ये वैद्यकीय पथकाद्वारे गडकरी यांची प्रकृती तपासण्यात आली. काळजीचे कोणतेही कारण नसल्याचे त्या पथकाने सांगितले. पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार ज्येष्ठ उद्योगपती बाबा कल्याणी यांना गडकरी यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता प्रदान करण्यात येणार होता. मात्र, आता हा पुरस्कार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते कल्याणी यांना प्रदान करण्यात येणार आहे.

गडकरी यांचा दौरा अचानक रद्द झाल्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक असलेल्यांचा हिरमोड झाला आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitin Gadkari's visit to Pune canceled