रस्त्याच्या बाजूला सर्रास विकत आहेत जडी-बुटी!

मिलिंद संगई
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

बारामती : शहरात अनेक ठिकाणी कोणतीही पदवी प्राप्त नसलेले परप्रांतिय लोक आयुर्वेदीक औषधे सर्रास विकत असताना त्यांना कोणीही रोखत नसल्याचे चित्र आहे. लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असतानाही त्यांच्यावर कारवाई होत नाही. 

अनेक परप्रांतिय लोक जडी बुटी व आयुर्वेदीक औषधे देऊन गुप्तरोग व इतर समस्या दूर करण्यासाठी रस्त्याच्या बाजूला दुकाने थाटून व्यवसाय करीत आहेत. शहरात अनेक ठिकाणी गाडी लावून तंबू टाकून असे व्यवसाय सर्रासपणे केले जात आहेत.

जडी बुटीच्या औषधातून रोगावर इलाज केला जाईल असे फलक लावून ही दुकाने चालविली जातात. 

या बाबत माहिती घेतली असता अशा दुकाने चालविणा-यांकडे कोणताही वैदयकीय परवाना नसताना जुजबी माहितीच्या आधारे औषधांची विक्री त्यांच्या माध्यमातून केली जात आहे. गरीब कुटुंबातील लोक अशा औषधांच्या मोहात पडताना दिसतात. 

या बाबत सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मीरा चिंचोलीकर यांच्याशी संपर्क साधला असता ही कारवाई नगरपालिकेकडून होण्या संदर्भात शासनाने अध्यादेश जारी केल्याची माहिती त्यांनी दिली. 

नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश कडुसकर यांनी या बाबत माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्याची ग्वाही दिली.

Web Title: no action against road side jadi buti sellers