पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये आघाडी नाही?

उत्तम कुटे : सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

युतीसाठी सकारात्मक असल्याचे दोन्ही पक्षांचे पदाधिकारी वारंवार सांगत आहेत. तिचा निर्णय स्थानिक पातळीवर होणार नसून त्याबाबत 'मातोश्री' वा 'शिवसेना भवन'(मुंबई)येथून आदेश निघणार असल्याने दोन्ही पक्षांना नाइलाजाने का होईना त्याबाबतचा निर्णय स्वीकारावाच लागणार आहे.

पिंपरी : आगामी महापालिका निवडणुकीसाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कॉंग्रेसची राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर (एनसीपी) आघाडी होण्याचे संकेत सोमवारी (ता. 2) आणखी कमी झाले. कॉंग्रेसचे शहरप्रभारी आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वक्तव्यानेही त्याला दुजोरा मिळाला. या निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती एकीकडे सुरू झाल्या असताना दोन्ही पक्षांकडून एकमेकांशी आघाडीसंदर्भात अद्याप प्राथमिक बोलणीही झालेली नाहीत.

कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्षांसह सात नगरसेवकांना नुकतेच एनसीपीने फोडल्याने दोन्ही कॉंग्रेसमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. त्याचा प्रत्यय आज आला. दोन महिन्यावर आलेल्या पालिका निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवड व पुणे येथे आघाडी करण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकमेकांना अद्याप विचारणा केली नसल्याचे पाटील यांनी सांगितले. तसेच भ्रष्टाचाराविरुद्ध उद्योगनगरीत तीव्र नाराजी दिसत असल्याचे सांगत त्यांनी एनसीपी अप्रत्यक्षपणे भाजपसारखे टीकेचे लक्ष्यही बनविले. दुसरीकडे आघाडीचा निर्णय कॉंग्रेस हा स्थानिक पातळीवर होणार आहे. दुसरीकडे निम्मा पक्ष गारद केल्याने शहर कॉंग्रेस व त्यांचे पदाधिकारी हे एनसीपीवर नाराजच नाही, तर संतापलेले आहे. त्यामुळे स्थानिक पदाधिकारी व त्यातही शहराध्यक्ष सचिन साठे हे एनसीपीशी आघाडी करण्याच्या विचारात नाहीत.

युतीचीही धाकधूक किंवा युती झाली प्रतिष्ठेची दुसरीकडे पुन्हा सत्तेत येऊ असा आत्मविश्‍वास असल्याने एनसीपीने अद्याप कॉंग्रेसला आघाडीबाबत साधी विचारणाही केलेली नाही. काठावर बहुमत मिळाले, तर शिवसेनेच्या मदतीने सत्तेत पुन्हा कायम राहण्याचा त्यांचा मनसुबा आहे. दुसरीकडे भाजपला शिवसेनेबरोबर युती वरकरणी नको असून एकहाती सत्तेत येण्यासाठी ती नको आहे.ती झाली नाही, तर शिवसेनेचाही फायदा होण्याची दाट शक्‍यता आहे. मात्र, युतीसाठी सकारात्मक असल्याचे दोन्ही पक्षांचे पदाधिकारी वारंवार सांगत आहेत. तिचा निर्णय स्थानिक पातळीवर होणार नसून त्याबाबत 'मातोश्री' वा 'शिवसेना भवन'(मुंबई)येथून आदेश निघणार असल्याने दोन्ही पक्षांना नाइलाजाने का होईना त्याबाबतचा निर्णय स्वीकारावाच लागणार आहे.

युतीसाठी फक्त भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी टाळीसाठी शिवसेनेच्या दोनपैकी फक्त शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्याशी हात पुढे केला आहे. मावळचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांना अमर साबळे वा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांच्याव्यतिरिक्त अद्याप कुणीही चर्चा केलेली नाही.त्यामुळे युती दोन्ही बाजूंकडून प्रतिष्ठेचा प्रश्‍न करण्यात आली आहे. मात्र, ती आरएसएस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मर्जीनुसार व आदेशानेच होणार असल्याचे दोन्ही पक्षांतील जबाबदार सूत्रांनी स्पष्ट केले आहे. 
 

Web Title: no alliance of ncp, congress in pune, pimpri