
थकबाकी न मिळाल्यास शुक्रवारपासून सीएनजीचा पुरवठा बंद
पुणे - सीएनजी पुरवठ्याचे (CNG Supply) पैसे (Money) वेळेत दिले नाहीत म्हणून पुन्हा एकदा पुरवठा बंद (Supply Close) करण्याचा इशारा महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) (MNGL) पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) (PMP) दिला आहे. गुरुवारपर्यंत (ता.१७) पैसे न भरल्यास शुक्रवारपासून (ता. १८) पुरवठा बंद करण्यात येर्इल, असे एमएनजीएलने स्पष्ट केले आहे. (No Arrears Received CNG Supply Cut Off from Friday MNGL PMP)
पीएमपीला एमएनजीएलचे ४९ कोटी २६ लाख रुपये देणे आहे. याबाबत एमएनजीएलकडून मार्चपासून पाठपुरावा सुरू आहे. पीएमपी ताफ्यात दोन हजारपेक्षा अधिक बसेस आहेत. त्यातील बाराशे बसेस या सीएनजीवर धावणा-या आहेत. या बसेससाठी एमएनजीएलकडून गॅस पुरवठा केला जातो. थकबाकी भरण्यासाठी एमएनजीएलने प्रशासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, तरीदेखील थकबाकी न भरल्याने एमएनजीएलने कठोर निर्णय घेत १८ तारखेपासून पुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे. प्रशासनाने १० जून रोजी एमएनजीएलला ५ कोटी रुपये दिले. मात्र, तरीदेखील थकीत रक्कम मोठ्या प्रमाणात आहे.
हेही वाचा: पैसे चोरल्याचा जाब विचारणाऱ्या पत्नीची दारुड्या पतीकडून हत्या
दरम्यान, संचारबंदीमुळे ३ एप्रिलपासून प्रवासी वाहतूक बंद असल्याने उत्पन्न मिळू शकले नाही. या पार्श्वभूमीवर एमएनजीएलची थकबाकी देण्यासाठी पीएमपीएल प्रशासनाने दोन्ही महापालिका आयुक्तांना अतिरिक्त निधीची मागणी केली आहे. हा निधी मिळाल्यास थकबाकी देता येणे शक्य असल्याची माहिती पीएमपीएल प्रशासनाकडून देण्यात आली.
एमएनजीएलला गेल्या दोन महिन्यात पाच कोटी रुपयांची थकबाकी देण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे पीएमपीच्या उत्पन्नावर देखील परिमाण झाला आहे. एमएनजीएल देण्यासाठी संचलन तुटीच्या व्यतिरिक्त दरमहा १० कोटी पुरविण्यात यावी, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
- डॉ. राजेंद्र जगताप, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी
Web Title: No Arrears Received Cng Supply Cut Off From Friday Mngl
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..