‘वायसीएम’मध्ये ‘बर्नवार्ड’च नाही

YCM-Hospital
YCM-Hospital

पिंपरी - शहरात गेल्या अकरा महिन्यांत विविध कारणांमुळे भाजलेल्या रुग्णांची संख्या १७३ आहे. असे असताना त्यांच्यावर तातडीने उपचार करणे गरजेचे असते. मात्र, महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात जळीत कक्षच (बर्न वॉर्ड) नसल्याने त्यांना ससून रुग्णालयांत दाखल करण्याशिवाय पर्याय राहत नाही. परिणामी, रुग्णांवर वेळेत उपचार न झाल्याने रुग्ण दगावल्याची संख्या अधिक आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची यशवंतराव चव्हाण रुग्णालयास नऊ रुग्णालये आहेत. परंतु त्यातील कोणत्याही रुग्णालयात जळीत कक्ष नाही. त्यामुळे भाजलेल्या रुग्णांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करावे लागते. ससूनमध्ये शहरासह मुळशी, मावळ, राजगुरुनगर, जुन्नर, आंबेगाव तालुक्‍यातील रुग्णांनाही उपचारासाठी दाखल केले जाते. वायसीएममध्ये जळीत कक्ष नसल्याने केवळ प्रथमोपचार केले जातात.

योग्य उपचारासाठी रुग्ण ससूनमध्ये दाखल होईपर्यंत उशीर झालेला असतो. परिणामी रुग्ण दगावण्याच्या घटना घडल्या आहेत. नुकतीच ‘महावितरण’च्या केबलचा धक्का लागून सुप्रिया खांडेकर या भाजल्या होत्या, त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांना प्रथमत: वायसीएममध्ये उपचारासाठी दाखले केले होते. भाजलेल्या रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचाराचा खर्च सर्वसामान्यांना न परवडणारा असतो. त्यामुळे भाजलेल्या रुग्णांना ससूनशिवाय पर्याय उरत नाही. गेल्या वर्षी १८६ जण भाजले होते. यंदा जानेवारी ते नोव्हेंबर या काळात वायसीएममध्ये १७३ जळीत रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. त्यात ४० ते ७० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक भाजलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात कंपनीतील दुर्घटनेत घटनांमध्ये, शॉर्टसर्किट अथवा अन्य कारणांमुळे लागलेली आग, स्टोव्हचा भडका, गॅस गळती, पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न आदी कारणांमुळे भाजण्याच्या घटना घडल्या आहेत. 

अठरा वर्षांपूर्वी मांडला प्रस्ताव 
जळीत रुग्णांच्या उपचारासाठी स्वतंत्र इमारतीची आवश्‍यकता असल्याची बाब लक्षात घेऊन याबाबत तत्कालीन मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नागकुमार कुणचगी यांनी २००९ मध्ये प्रस्ताव मांडला होता. त्यासाठी वीस कोटींचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविला होता. त्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद केली होती. परंतु त्या प्रस्तावाचा सर्वांनाच विसर पडल्याचे दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com