शहरातील "एटीएम'मध्ये "खडखडाट' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

पुणे - जोडून आलेल्या सुट्या, "मार्च एन्डिंग' अशा कारणांमुळे आणि स्थानिक पातळीवर बॅंकांच्या अधिकाऱ्यांकडून झालेल्या गैरव्यवस्थापनामुळे शहराच्या विविध भागा?तील एटीएममध्ये "खडखडाट' पडल्याचे पाहायला मिळत आहे. 

एटीएम केंद्रांमध्ये पुरेसे चलन उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. किमान पाच ते सहा ठिकाणच्या एटीएम केंद्रांवर जाऊन पैसे काढण्याचा प्रयत्न नागरिकांना करावा लागत आहे. त्यातच, काही भागातील एटीएम केंद्रांवर पैसे काढून घेण्याची मर्यादा चार ते पाच हजार रुपयांची आहे. त्यामुळे जादा पैसे काढून ठेवण्याची सोयसुद्धा नागरिकांना मिळत नाही. 

गेल्या वर्षी 8 नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता जुन्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय सरकारकडून जाहीर करण्यात आला. त्यानंतर दोन हजार रुपये मूल्याच्या नव्या नोटा बाजारात दाखल झाल्या होत्या; मात्र नव्या पाचशे रुपयांच्या नोटांचा पुरेसा पुरवठा होण्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागला. जानेवारी महिन्यात नव्या नोटांचा पुरवठा सुरळीत झाल्यानंतर नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते, मात्र आता पुन्हा काही कारणास्तव "एटीएम'मधून पैसे काढण्यावर मर्यादा आल्या आहेत. 

खासगी बॅंकेच्या काही अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार रिझर्व्ह बॅंकेकडून सर्व बॅंकांना पुरेसा चलनपुरवठा केला जात आहे. सलग सुट्या आणि आर्थिक वर्षअखेर असलेल्या कामाच्या ताणामुळे काही बॅंकांकडून "एटीएम'मध्ये पैशांचा भरणा पुरेशा प्रमाणात झालेला नाही. स्थानिक पातळीवर प्रत्येक शाखेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी मागणी-पुरवठ्याचा अंदाज घेऊन एटीएम केंद्रांमध्ये पैशांचा भरणा करणे अपेक्षित असते. त्यांनी गैरव्यवस्थापन केल्यास त्याचा थेट फटका नागरिकांना बसतो; तसेच एखाद्या "एटीएम'मध्ये किती पैसे उपलब्ध ठेवायचे याची मर्यादा नसते, मात्र विम्याच्या रकमेएवढीच रक्कम सहसा एटीएम केंद्रांमध्ये ठेवण्याकडे बॅंकांचा कल असतो. शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर एटीएममध्ये जादा रक्कम उपलब्ध करून दिल्यास नागरिकांचा त्रास वाचेल, असेही काही बॅंक अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Web Title: No cash in ATM