सरपंचांविरोधात तीन महिन्याच्या आत दुसऱ्यांदा अविश्वास ठराव

grampanchayat
grampanchayat

उरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या सरपंच अश्विनी राजेंद्र कांचन यांच्यावर तीन महिन्याच्या आत दुसऱ्यांदा शनिवारी (ता. 15) ठराव आणला जाणार आहे. सरपंच अश्विनी कांचन यांच्यावर तीन महिन्यांपूर्वी मंजूर झालेला अविश्वास ठराव तांत्रिक कारण देत जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी नुकताच रद्दबादल ठरवला. या पार्श्वभूमिवर शनिवारी पुन्हा अविश्वाश ठरावाचे कामकाज होणार असून, यावेळी तरी सरपंच पाय उतार होणार का याकडे पुर्व हवेलीचे लक्ष लागून राहिले आहे. 

सतरा ग्रामपंचायत सदस्य असलेल्या उरुळी कांचन ग्रामपंतीच्या सरपंच अश्विनी कांचन यांच्याविरुध्द तीन महिन्यांपूर्वी तेरा सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. मात्र प्रत्यक्ष अविश्वास ठरावाच्यावेळी चौदा सदस्यांनी कांचन यांच्यावर अविश्वास दाखवला होता. मात्र कांचन यांनी मात्र अविश्वास ठरावाच्या बैठकीची नोटीस वेळेत न मिळाल्याची कारण देत, हा तो रद्द करण्याचे अपील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केले होते. यात उरुळी कांचन तलाठी कार्यालयाकडून अश्विनी कांचन यांना अविश्वास ठरावाच्या बैठकीची मिळालेली नोटीस ही वैध काळात मिळाली नसल्याचे निष्पन्न झाल्याने, जिल्हाधिकाऱ्यांनी अविश्वास ठराव रद्द करण्याचे आदेश दहा दिवसापूर्वी दिले होते. 

मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाने कांचन यांच्या बाजुने दिलेला आदेश हा चुकाचा असुन, हा सत्ताधारी मंत्र्याच्या सुचनेनुसार दिल्याचा आरोप संतोष हरीभाऊ कांचन व जितेंद्र बाळासाहेब बडेकर यांच्यासह पंधरा ग्रामपंचायत सदस्यांनी केला होता. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशाची शाई वाळण्यापुर्वीच पंधरा सदस्यांनी कांचन याच्यावर नव्याने अविश्वास ठराव दाखल केला होता. या नव्याने दाखल केलेल्या अविश्वाश ठरावावर उद्या (शनिवारी) फैसला होणार आहे.

उपसरपंचपदाची निवडणूक रद्द
जिल्हाधिकारी कार्यालयाने अश्विनी कांचन यांच्या बाजूने निकाल देताच, कांचन यांनी तातडीने उपसरपंच पदाची निवडणुक आपल्या अधिकारात जाहीर केली होती. सतरापैकी तब्बल पंधरा सदस्य विरोधात असताना, उपसरपंचपदाची निवडणुक होणार का आणि झाल्यास ती वैध धरणार का याबद्दल आठवडाभर उरुळी कांचन परीसरात चर्चा चालु होती. मात्र प्रत्यक्ष उपसरपंचपदाच्या निवडणुकी दरम्यान स्वतः सरपंच म्हणजेच निवडणुक निर्णय अधिकारी गैरहजर राहिल्याने प्रशासनाने ही निवडणुक रद्द केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com