पुण्यात झेडपीच्या पाणी योजना चालविण्यास ठेकेदार मिळेना

Pune-ZP
Pune-ZP

पुणे - जिल्हा परिषदेच्यावतीने चालविण्यात येत असलेल्या आठ प्रादेशिक पाणी पुरवठा योजना चालविण्यासाठी ठेकेदार मिळेना झाला आहे. या योजना देखभाल व दुरुस्तीसाठी खासगी तत्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. त्यानुसार याबाबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पहिल्या निविदांना अल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे याबाबत आता फेरनिविदा काढल्या जाणार असल्याचे अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी मंगळवारी (ता.२३) सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांच्या विज देयकांची आणि पाणीपट्टीची मोठी थकबाकी आहे. शिवाय या योजना चालविण्यासाठीचा खर्चही अवाढव्य आहे. आहे. यासाठीच या योजना खासगी तत्वांवर चालविण्यास देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पानसरे यांनी स्पष्ट केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्रकुमार कदम आदी उपस्थित होते.

पानसरे म्हणाल्या, ‘‘या पाणी योजनांची पाणी पट्टी आता ठेकेदारांकडूनट वसूल केली जाणार आहे. पाण्याचा दर वाढविण्यात येणार नसून, खासगीकरणामुळे अधिक चांगली सेवा मिळणार आहे. पहिल्या निविदेमधील काही अटी व शर्ती शिथिल करण्याची मागणी पुढे आली आहे. या मागणीनुसार येत्या बुधवारी (ता.२४) होत असलेल्या जल व्यवस्थापन समितीच्या सभेत निर्णय घेतला जाईल. त्यानंतर नवीन अटी व शर्तीचे पत्र काढण्यात येईल.’’

या पाणी योजनांच्या खासगीकरणासाठीची निविदा प्रक्रिया पहिल्यांदा ११ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात आली. यामध्ये शिवरी, पोखरीच्या योजनेसाठी एकाही निविदाधारकाने प्रतिसाद दिला नाही. बेल्हे, मुळशी, पाटणसाठी प्रत्येकी केवळ एक निविदा प्राप्त झाली. भिमाशंकर, मोरगाव, कार्ला या योजनांसाठी प्रत्येक दोन निविदाधारकांचा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे फेरनिविदा काढण्यात आली आहे. फेरनिविदेत येत्या २६ फेब्रुवारीपर्यंत निविदा मागविल्या अहेत. त्या १ मार्चला उघडण्यात येणार आहेत.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com