पुणेकर घरातच; रस्त्यावरील गर्दी ओसरली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

- शाळा - महाविद्यालयांना सुट्टी असल्यामुळे पुणे शहरातील रस्त्यांवरील गर्दी सोमवारच्या तुलनेत मंगळवारी कमी झाल्याचे दिसून आले. 
- पुणे आणि परिसरातील 6 पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वाहतुकीवर मर्यादा आल्या आहेत.

पुणे : शाळा - महाविद्यालयांना सुट्टी असल्यामुळे पुणे शहरातील रस्त्यांवरील गर्दी सोमवारच्या तुलनेत मंगळवारी कमी झाल्याचे दिसून आले. त्यातच पुणे आणि परिसरातील 6 पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वाहतुकीवर मर्यादा आल्या आहेत.

पावसानेही पहाटे सहा वाजल्यापासून जोर कायम धरल्यामुळे पुणेकरांनी घरातच बसणं पसंत केल्याचे दिसत आहे. फक्त नोकरदार घराबाहेर पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे पीएमपीच्या बसला देखील गर्दी कमी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No crowd of vehicle On the road In Pune

टॅग्स