पुणे शहराचा अनादर केलेला नाही - चव्हाण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

पुणे - ""शहरात पडलेला कचरा पाहून एक लोकप्रतिनिधी म्हणून मला या परिस्थितीची लाज वाटते,'' अशी भावना मी व्यक्त करताना, पुणे शहराबद्दल कोठेही अनादर व्यक्त केलेला नाही, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा आणि खासदार वंदना चव्हाण यांनी केले आहे. 

शहरात साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांबाबत चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी महापौर प्रशांत जगताप यांना निवेदन दिले होते. स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधीही त्या वेळी उपस्थित होते. निवेदन देताना केलेल्या वक्तव्याबाबत नागरिकांची दिशाभूल करून भाजप, शिवसेना, मनसे आणि कॉंग्रेसने महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत टीका केली होती. या पार्श्‍वभूमीवर प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात चव्हाण म्हणाल्या, ""महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता असली, तरीही शहराच्या समस्या सोडविण्याचे प्रत्यक्ष अधिकार फक्त महापालिका आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांनाच आहेत. कचरा, पाणी, आरोग्य आदी समस्या सोडविण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यामुळे प्रशासनाला देण्यासाठी महापौरांना निवेदन दिले आहे.'' 

कचऱ्याचे निवेदन देणे किंवा महापौरांचा बसचा प्रवास, याबद्दल गैरलागू विधाने करून भाजपचे शहराध्यक्ष आणि पालकमंत्री स्वतःचे अज्ञान आणि असंवेदनशीलता प्रकट करीत आहेत. वाढत्या कचऱ्यामुळे अस्वस्थ होऊन प्रामाणिक आणि जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून महापौरांना निवेदन दिले होते, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.

Web Title: No disrespect Pune - Chavan