डॉक्‍टरांच्या सल्ल्याला तंत्रज्ञान पर्याय नाही - एम. के. उन्नी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

पुणे - ‘‘दया, सहानुभूती, सामाजिक बांधिलकी आणि प्रभावी संवाद कौशल्य हे आधुनिक काळातील वैद्यकीय सेवेसाठी आवश्‍यक गुण आहेत.

अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि गतिमान वैद्यकशास्त्र हे डॉक्‍टरांच्या सल्ल्याला पर्याय ठरू शकत नाही,’’ असा विश्‍वास लष्करी वैद्यकीय सेवेचे (एएफएमएस) महासंचालक लेफ्टनंट जनरल एम. के. उन्नी यांनी व्यक्त केला.

पुण्यातील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयातील (एएफएमसी) बुधवारी ५१व्या तुकडीचे दीक्षान्त संचलन झाले. या वेळी मानवंदना स्वीकारल्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. ‘एएफएमसी’चे कमांडंट आणि संचालक एअर मार्शल सी. के. रंजन उपस्थित होते. 

उन्नी म्हणाले, ‘‘लष्कराच्या गणवेशातील वैद्यकीय सेवेला मोठा इतिहास आहे. गणवेशातील डॉक्‍टरांनी वेळोवेळी पराक्रम, साहस आणि त्याग केला आहे.

आधुनिक काळात वैद्यकीय तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. अशा काळातही डॉक्‍टरांच्या शब्दावर रुग्णाचा विश्‍वास असतो. त्यामुळे रुग्णांबद्दल दया, त्यांच्याबद्दलची सहानुभूती, सामाजिक बांधिलकी आणि संवाद कौशल्य हे गुण आधुनिक काळातही महत्त्वाचे ठरतात.’’ आतापर्यंत आत्मसात केलेल्या वैद्यकीय ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करण्याची वेळ आता आली आहे. या दरम्यान तुमच्याकडून काही चुका होतील; पण त्या चुकांमधून प्रत्येक वेळी नवे शिकण्याची संधी तुम्हाला मिळेल. त्याच आधारावर तुमच्या भविष्यातील यशाचा पाया पक्का बांधला जाईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. 
फ्लॅग ऑफिसर अभिषेक कुमार यांनी संचलनाचे नेतृत्व केले. या तुकडीतून शंभर वैद्यकीय तज्ज्ञ लष्करी सेवेत रुजू झाले असून, त्यात ८१ पुरुष आणि १९ स्त्रियांचा समावेश आहे. आतापर्यंत या वैद्यकीय महाविद्यालयातून ६ हजार ४०४ डॉक्‍टर उत्तीर्ण झाले आहेत.

Web Title: No doctor's advice technology options