ऐन उन्हाळ्यात पुण्यात आज सायंकाळपर्यंत वीज बंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

मनोऱ्याची उंची वाढविण्यासाठी 220 केव्ही पर्वती-नांदेड सिटी व 220 केव्ही पर्वती-फुरसुंगी वाहिन्यांमधून विद्युत पुरवठा होणारी उपकेंद्रे आझ सकाळी सात ते सायंकाळी पाच पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

पुणे : देहूरोड कात्रज बायपास महामार्गावरील मनोऱ्याची उंची वाढविण्याच्या कामाकरीता आज (गुरुवार) सकाळी सात ते सायंकाळ पाचपर्यंत शहारातील बहुतांश भागातील वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना आणखी त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.

महावितरण प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, मनोऱ्याची उंची वाढविण्यासाठी 220 केव्ही पर्वती-नांदेड सिटी व 220 केव्ही पर्वती-फुरसुंगी वाहिन्यांमधून विद्युत पुरवठा होणारी उपकेंद्रे आझ सकाळी सात ते सायंकाळी पाच पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. वीज बंद असलेल्या भागांत सर्व पेठा, वडगाव बुद्रुक, हिंगणे, रामनगर, सिंहगड रोड, पर्वती, स्वारगेट, विठ्ठलवाडी, अरण्येश्वर, नऱ्हे, धनकवडी, आंबेगाव, पौड रोड, कोथरूड, बिबवेवाडी, सहकारनगर, बालाजीनगर, कोंढवा अशा जवळपास सर्व पुण्यातील भागाचा समावेश आहे.

तापमान वाढल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना वीज बंद असल्याने आणखी त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. महावितरणने गैरसोईबद्दल कंपनी दिलगीर असून वीज ग्राहकांनी कृपया सहकार्य करावे अशी विनंती केली आहे.

Web Title: no electricity in Pune