जप्त वाहनांचे मालक सापडेनात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

पुणे -  महापालिकेने ताब्यात घेतलेली चारचाकी आणि दुचाकी वाहने गुन्ह्यात वापरल्याचा संशय बळावल्याने या वाहनांची माहिती गोळा करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. मुळात, ही वाहने नेमकी कोठून उचलली, तेव्हा त्यांची स्थिती काय होती, मूळ मालकांचा शोध घेतला का, या प्रश्‍नांची उत्तरे आता महापालिकेला पोलिसांना द्यावी लागणार आहेत. त्यामुळे बेवारस वाहनांवरील कारवाईनंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला प्रत्येक वाहनांच्या मूळ मालकांपर्यंत पोचावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु, सर्व वाहनांची माहिती आधीच दिल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. 

शहरात बेवारस असलेल्या ६४० वाहनांवर कारवाई करीत, महापालिकेने ती जप्त केली आहेत. त्यातील ६० वाहने मूळ मालकांनी दंड भरून परत नेली आहेत. मात्र, उर्वरित वाहनांची माहिती पोलिसांकडे देण्यात आली. तेव्हा, ४१ चारचाकी वाहनांना दुचाकीचे क्रमांक वापरल्याचे पोलिसांच्या तपासणीत आढळून आले आहे. त्यामुळे  ही वाहने गुन्ह्यात वापरण्यात आल्याचा संशय आहे. त्यामुळे सर्वच वाहनांच्या क्रमांकाची पडताळणी करण्याबाबतचे पत्र महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलिसांना दिले आहे. चौकशीसाठी महापालिकेला आता पुन्हा जप्त केलेल्या वाहनांच्या मालकांचा शोध घ्यावा लागणार आहे. तशा सूचना पोलिसांनी पालिकेला केल्या आहेत. 

जी वाहने जप्त केली आहेत. त्यांची माहिती पोलिसांकडे दिली आहे. ही वाहने कोणाची आहेत, याचा तपास कारवाईदरम्यान घेण्यात आला होता. त्यानुसार काही वाहनमालकांना दंड आकारून ती त्यांच्याकडे देण्यात आली आहेत. उर्वरित वाहनांचे क्रमांक पडताळून घेण्यात येतील. त्यासाठी पोलिस यंत्रणेला सहकार्य करू.
- माधव जगताप, अतिक्रमण विभागप्रमुख, महापालिका

Web Title: NO found owner of the seized vehicles