निधीच्या अभावामुळे वर्षभरात फक्त अर्धा किलोमीटर रस्ता पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

पुणे : वारजे डुकर खिंड ते तिरुपतीनगर हा पर्यायी रस्ता अर्धा किलोमीटरपर्यंत पूर्ण झाला आहे. निधी मिळत नसल्याने रस्ता अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

सेवारस्त्याजवळ अनेक मोठ्या सोसायट्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे येथील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. डुकर खिंडीतून कर्वेनगरला जाण्यासाठी हा पर्यायी सेवारस्ता आहे. या रस्त्यामुळे नागरिकांचे जवळपास दोन किलोमीटरचे अंतर वाचणार आहे.

शहाराबाहेरून येणाऱ्या नागरिकांना महामार्गावरून एकदम सेवारस्त्याने शहारात प्रवेश करता येऊ शकतो, असा हा मोक्‍याचा रस्ता नागरिकांसाठी लवकरात लवकर सुरू होणे गरजेचे आहे. अर्धवट तयार झालेल्या रस्त्याचा नागरिकांना काहीच फायदा होत नसल्याचे चित्र सध्यातरी पाहावयास मिळत आहे. 

डुकर खिंड ते डीपी रस्ता हा येथील सोसायटीसाठी उपयोगी आहे. येथील नागरिकांना या रस्त्याने परस्पर मुख्य रस्त्याला येता-जाता येणार नाही. तसेच हा डीपी रस्ता मोठा असल्याने कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी होणार नाही. त्यासाठी महापालिकेने एकदाच हा रस्ता तयार करावा, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

Web Title: No fund for Warje road since one year