आरोग्यप्रमुख ‘हवेत’च

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

पुणे - सर्वसामान्यांना चांगली आरोग्य सेवा पुरविण्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सेवा-सुविधा उभारण्यात येत आहेत. मात्र, आरोग्यप्रमुखच नसल्याने आरोग्य यंत्रणा अशक्त होऊ लागली आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत विधिमंडळात  केलेली घोषणा हवेतच विरली आहे.

पुणे - सर्वसामान्यांना चांगली आरोग्य सेवा पुरविण्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सेवा-सुविधा उभारण्यात येत आहेत. मात्र, आरोग्यप्रमुखच नसल्याने आरोग्य यंत्रणा अशक्त होऊ लागली आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत विधिमंडळात  केलेली घोषणा हवेतच विरली आहे.

तत्कालीन आरोग्यप्रमुख डॉ. एस. टी. परदेशी हे मार्च २०१७ मध्ये निवृत्त झाले. त्यानंतर महिन्यात नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल, अशी घोषणा सत्ताधाऱ्यांनी केली. त्याच वेळी सहायक आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे यांच्याकडे आरोग्यप्रमुखाचा कार्यभार सोपविला. गेल्या वर्षी पावसाळ्यात साथीच्या आजारांचा फैलाव झाल्याने आरोग्य यंत्रणेवर बोट ठेवले. दरम्यान, खात्याने राबविलेल्या निविदा आणि साहित्य खरेदीवरून गोंधळ निर्माण झाला. या पार्श्‍वभूमीवर आरोग्यप्रमुख नेमण्याचा सर्वपक्षीय आमदारांनी विधी मंडळाच्या अधिवेशनात प्रश्‍न उपस्थित केला. त्यावर कार्यवाहीचे आश्‍वासन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिले होते. मात्र, त्याबाबतचा निर्णय रेंगाळला आहे. परिणामी, पावणेतीनशे कोटींची आर्थिक तरतूद असलेल्या या खात्याचे कामकाज ‘प्रमुखाविना’च सुरू आहे.

सर्व रुग्णालयांमधील यंत्रणेवर अधिक लक्ष दिले जाते. रुग्णांसाठी नव्या सुविधा पुरविण्यात येत आहेत. अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. त्याबाबतच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय होण्याची आशा आहे.
- डॉ. अंजली साबणे, प्रभारी आरोग्यप्रमुख, महापालिका 

रुग्णांची संख्या वाढत असल्याने तेवढ्या प्रमाणात यंत्रणा उभारण्याचा प्रयत्न आहे. काही भागांत नवी रुग्णालये आणि केंद्र सुरू करण्यात आले आहेत.
- डॉ. संजीव वावरे,  सहायक आरोग्य अधिकारी, महापालिका 

Web Title: No health officer in Municipal Hospital