पालखी महामार्गाचे पंचनामे करण्यास आमची हरकत नाही; शेतकऱ्यांची भूमिका

राजकुमार थोरात
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

वालचंदनगर (पुणे) : संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचा मोबदला देताना शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची प्रशासनाच्या वतीने काळजी घेण्यात येत आहे. पंचानामे झाल्याशिवाय नुकसानभरपाईचा दर ठरवता येत नसल्याने शेतकऱ्यांनी पंचनाम्यासाठी सहकार्य करण्याचे प्रांतधिकारी हेमंत निकम यांनी आवाहन  केल्यानंतर  तालुक्याच्या पश्‍चिम भागातील शेतकऱ्यांनी पंचनामे करुन देण्यास हरकत नसल्याचे सांगितले.

वालचंदनगर (पुणे) : संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचा मोबदला देताना शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची प्रशासनाच्या वतीने काळजी घेण्यात येत आहे. पंचानामे झाल्याशिवाय नुकसानभरपाईचा दर ठरवता येत नसल्याने शेतकऱ्यांनी पंचनाम्यासाठी सहकार्य करण्याचे प्रांतधिकारी हेमंत निकम यांनी आवाहन  केल्यानंतर  तालुक्याच्या पश्‍चिम भागातील शेतकऱ्यांनी पंचनामे करुन देण्यास हरकत नसल्याचे सांगितले.

गेल्या आठवड्यामध्ये बेलवाडी,लासुर्णे,जंक्शन,अंथुर्णे परीसरातील शेतकऱ्यांनी पंचनामे करीत असताना प्रशासनाला पंचनामे करुन दिले नव्हते. आज (ता. 30) प्रांतधिकारी हेमंत निकम यांनी जंक्शन व भरणेवाडी येथे शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी नॅशनल हायवे अॅथोरटी व प्रशासनाचे समन्वयक  चेतन गावडे,मंडलधिकारी गिरीष संदीकर, ग्रामसेवक  युवराज गावडे,महादेव पोटफोडे  उपस्थित होते. यावेळी निकम यांनी सांगितले की, जमीनीचा मोबदला देताना जागेचे बागायती,जिरायती,गावठाण व बिगरशेती मध्ये वर्गीकरण करण्यात येणार असून प्रत्येकाचे दर वेगवेगळा असणार आहे.सध्याच्या रेडी-रेकनरच्या चार पट दर दिला जाणार आहे.

महामार्गामध्ये शेतकऱ्यांची घरे, झाडे, फळबागा, विहिरी, पाइपलाईन नुकसान होणार आहे. काहींची घरे जुनी आहेत. तर काहींची घरे नवी आहेत. त्यांचे पंचनामे केल्याशिवाय किती नुकसान होणार आहे हे समजणार नसून दरनिश्‍चित ही करता येणार नाही. सध्या पाटस ते सराटीपर्यंतच्या 45 गावांमध्ये मोजणीची प्रक्रिया पूर्ण होऊन हद्दी निश्चित झाल्या आहेत.

शेतकऱ्यांनी सहकार्य केल्यास एक-दीड महिन्यामध्ये पंचनामेपूर्ण होतील.पंचनामे पूर्ण झाल्यानंतर जागेचा मोबदला व नुकसानीचा मोबदला दिवाळीमध्ये देणे शक्य होणार असल्याचे सांगितले. जंक्शनमध्ये  सरपंच राजकुमार भोसले, उपसरपंच फिरोज सय्यद, भरणेवाडीमध्ये उपसरपंच गुलाब म्हस्के,माजी सरपंच राहुल साबळे, निलेश धापटे उपस्थित हाेते. 

आंदोलनास दुसरेच नागरिक पुढे...
यावेळी प्रांतधिकारी हेमंत निकम यांनी सांगितले पाटस ते सराटीच्या दरम्यान ज्या नागरिकांची,शेतकऱ्यांची महामार्गाच्या कामामध्ये जमीन जात नाही, ज्यांचे नुकसान होत नाही. ते नागरिक आंदोलनासाठी पुढे येतात. व ज्यांची जमीन आहे,नुकसान होणार आहे. ते पाठीमागे  थांबत असल्याचा प्रकार घडत आहे. यामुळे कामाला विनाकारण विलंब व अडथळे येत असल्याचे सांगितले.

Web Title: no objection for panchnama of palakhi road said farmers