उन्हाच्या चटक्‍यांनी  रस्त्यावर शुकशुकाट 

उन्हाच्या चटक्‍यांनी  रस्त्यावर शुकशुकाट 

पुणे - उन्हाच्या वाढत्या चटक्‍यांमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर भरदुपारी शुकशुकाट जाणवत होता. रविवार सुटीचा दिवस असल्याने भर उन्हात घरातच बसण्यास पुणेकरांनी प्राधान्य दिले. संध्याकाळी मात्र शहरातील प्रमुख रस्त्यांवर गर्दी वाढल्याचे चित्र दिसत होते. दरम्यान, शहरात येत्या सोमवारी (ता. 3) संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. 

शहरात शिवाजीनगर येथे रविवारी कमाल तापमानाचा पारा 39.4 अंश सेल्सिअस नोंदला गेला. सरासरीपेक्षा 4.1 अंश सेल्सिअसने हे तापमान वाढले होते. तर लोहगाव येथे कमाल तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडली होती. तेथे सरासरीपेक्षा 6.5 अंश सेल्सिअसने कमाल तापमानाच्या पाऱ्याने उसळी मारून 40.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. या भागात उष्णतेची लाट निर्माण झाल्याने हे कमाल तापमानाचा पारा वाढल्याचेही हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले. 

शहर आणि परिसरात गेल्या आठवड्यापासून उन्हाचा चटका सातत्याने जाणवत आहे. चाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान कायम तापमान नोंदले जात आहे. मात्र पुढील दोन दिवसांमध्ये शहरातील आकाश संध्याकाळी अंशतः ढगाळ होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे हा कमाल तापमानाचा पारा 38 अंश सेल्सिअस नोंदला जाईल, असेही त्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com