esakal | पैशांअभावी उपचारापासून कोणीही वंचित राहणार नाही- अजित पवार | Pune
sakal

बोलून बातमी शोधा

AJIT PAWAR

पैशांअभावी उपचारापासून कोणीही वंचित राहणार नाही- अजित पवार

sakal_logo
By
मिलिंद संगई, बारामती

बारामती : पैशांअभावी उपचारापासून कोणी वंचित राहणार नाही याची काळजी आम्ही घेणार असून त्या साठी बारामतीचे शासकीय सर्वोपचार रुग्णालय वरदान ठरेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.

येथील सर्वोपचार रुग्णालयामध्ये डॉक्टर्स फॉर यू संस्थेच्या माध्यमातून बोईंग कंपनीच्या सीएसआरमधून सीटी स्कॅनचे मशीन प्रदान करण्यात आले आहे. या मशीनचे लोकार्पण आज (ता. 10) अजित पवार यांच्या हस्ते झाले, त्या प्रसंगी ते बोलत होते.

बोईंग कंपनीच्या चीफ ऑफ स्टाफ प्रवीणा यग्नम भट, वॉलमार्ट कंपनीचे इंडिया लिड हेमंत अग्रहारी, स्टँटर्ड चार्टर्ड बँकेचे असोसिएट डायरेक्टकर संदीप खाडे, डायव्हर्सी कंपनीचे मार्केटींग हेड अरुदीपा रथ, कॅटरपिलर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तन्मय मुजुमदार, डॉक्टर्स फॉर यु संस्थेचे अध्यक्ष डॉ. रजत जैन, सचिव साकेत झा, संचालक डॉ. वैशाली वेणू, समन्वयक झायेद शेख, संदीपन गणपती, मेंटॉस फाऊंडेशनचे प्रमुख डॉ. संतोष भोसले, विप्रो अँड जीई हेल्थ केअरचे राजीव कौशिक, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, गटनेते सचिन सातव, प्रभाती अधिष्ठाता यशवंत कुलकर्णी, प्रशासन अधिकारी नंदकुमार कोकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

पवार म्हणाले, येथील आयसीयु युनिट, सीटी स्कॅन मशीनसह दवाखान्याची ओपीडी तातडीने सुरु व्हायला हवी. सार्वजनिक बांधकाम विभागाने याची डेडलाईन द्यावी, हे काम वेळेत पूर्ण झाले नाही तर गाठ माझ्याशी आहे, कोविडच्या दोन्ही लाटेत या रुग्णालयाची 500 खाटांची क्षमता असूनही त्याचा उपयोग झाला नाही याची खंत मला आहे. मेडीकल कॉलेज व दवाखाना किती तारखेला पूर्ण करणार याचे वेळापत्रकच देण्याची सूचना त्यांनी केली. सीटी स्कॅन लवकर सुरु झाले तर त्याचा लाभ बारामतीकरांना होईल.

हेही वाचा: कोल्हापूर - रविवारी कॅन्डल मार्च तर सोमवारी जिल्हा बंद

सर्व कंपन्याप्रती कृतज्ञता...

ज्या कंपन्यांनी सीएसआरच्या माध्यमातून बारामतीला मदत केली त्यांच्याविषयी अजित पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली. डॉ. संतोष भोसले यांच्या माध्यमातून जवळपास चौदा कोटी रुपयांची वैद्यकीय मदत बारामतीला मिळाली या बद्दलही त्यांनी आभार मानले. बारामतीतील नियोजित आयुर्वेदीक महाविद्यालयासाठी सव्वा दोनशे कोटी रुपयांची तरतूद केल्याचेही अजित पवार यांनी नमूद केले.

loading image
go to top